Vitamin For Brain Health | मेंदू तल्लख करण्यासाठी दररोज करा ‘या’ पदार्थ्यांचे सेवन, उतारवयातही आठवतील बालपणीच्या गोष्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vitamin For Brain Health | माणसाचे उतारवय झाले की, त्यासोबत अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. शरीरात कमजोरी निर्माण होते. त्याचप्रमाणे हाडे देखील ठिसूळ होतात. दिसायला देखील कमी येते. त्याचप्रमाणे म्हातार वयात लोकांची स्मरणशक्ती देखील कमजोर होते. म्हणजेच त्यांना अगदी तासाभरापूर्वी घडलेल्या गोष्टी सुद्धा नीट आठवत नाही. परंतु आजकाल ही समस्या केवळ उतार वयातील लोकांना नाही तर 25 ते 27 वयोगटातील तरुणांना देखील येत आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील तरुणांना लक्षात राहत नाहीत. अनेक लोक डॉक्टरकडे जाऊन स्मरणशक्ती वाढवण्याचे औषध घेतात. परंतु या औषधाचे आपल्या बॉडीवर काही साईड इफेक्ट देखील होत असतात. परंतु आज आम्ही मेमरी पॉवर वाढण्यासाठी अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यांनी तुमची स्मरणशक्ती (Vitamin For Brain Health) खूप चांगली होईल.

तुम्हाला जर तुमची स्मरणशक्ती तल्लख करायची असेल तर त्यासाठी काही व्यायाम करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आहारात देखील काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केला पाहिजे. याने तुमच्या शरीराला पोषण मिळते त्याचप्रमाणे तुमची बुद्धी देखील चांगली होते. एका संशोधनानुसार असे समोर आले आहे की, तुमचा मेंदू तल्लख करण्यासाठी विटामिन डीची खूप गरजेचे असते. विटामिन डी जर असेल तर उतारवयात देखील तुमची स्मरणशक्ती चांगली राहते. व्हिटॅमिन डीमुळे तुमची हाडे देखील मजबूत होतात. आता आपण पाहूयात अशा कोणते पदार्थ खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती तल्लख (Vitamin For Brain Health) होईल.

मशरुम

मशरूममध्ये विटामिन डी मुबलक प्रमाणात असते. यामध्ये विटामिन डी 6 आणि सेलेनियमची योग्य मात्रा असते. मशरूम ब्लड सेल्स बनवण्यास मदत करते. त्याचप्रमाणे मेंदूला पोषण देखील मिळते. म्हणून स्मरणशक्ती करण्यासाठी आहारात मशरूमचे सेवन करावे.

दूध

मेंदूच्या विकासासाठी दूध खूप लाभदायक आहे. दुधाने तुम्हाला खूप फायदे होतात. दुधामध्ये हेल्दी फॅट्स असतात जे तुमच्या मेंदूच्या नसा मजबूत करतात.

सोया मिल्क | Vitamin For Brain Health

अनेक लोकांना गाई आणि म्हशीचे दूध आवडत नाही. कारण यात लॅक्टोज असते. आणि ते शरीर पचवू शकत नाही. अशावेळी तुम्ही सोया मिल्कचे देखील सेवन करू शकता. हे सोया मिल्क मेमरी पावर आणि ब्रेनसाठी खूप चांगले असते.

फॅटी फिश

जे लोक मासे खातात त्यांचा मेंदू खूप हेल्दी असतो. असे देखील मानले जाते. कारण माशांमध्ये नैसर्गिक पद्धतीने विटामिन डी असते. त्यामुळे मांसाहारी लोकांना आरामात ते पोषण मिळते म्हणूनच मेंदूच्या चांगल्या विकासासाठी माशांचे सेवन करणे देखील गरजेचे आहे.

फोर्टिफाइड फुड

तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर फोर्टिफाइड आहार घेणे खूप गरजेचे आहे. दूध, सिरियल, ओटमील आणि संत्र्यांचा ज्यूस यात व्हिटॅमिन असते. ज्यामुळं मेमरी पॉवर वेगाने काम करते. मुलांसाठी हे ब्रेन फुड्स फायदेशीर ठरतात.