पाचवड | विवेकवाहिनीची स्थापना डॉक्टर नरेंद्र दाभोलकर व महाराष्ट्रातील विचारवंत शिक्षणतज्ञांची देणगी असून आज सभोवतालची गढूळता दूर करण्यासाठी विवेकवाहिन्या हव्यातच, असे मत विवेकवाहिनीचे प्रसारक प्राध्यापक सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, पाचवड येथे विवेकवाहिनी व अर्थशास्त्र विभाग यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात,” विवेकवाहिनी का आणि कशासाठी ” या विषयावर ते बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राजेंद्र देशमुख तर गणेश तारू हे प्रमुख उपस्थित होते
विवेकवाहिनीबाबत बोलताना पुढे ते म्हणाले की विवेकवाहिनी हे महाविद्यालयातील विचारी विद्यार्थी व प्राध्यापक यांचे संघटन आहे, महाराष्ट्र विवेकवाहिनीशी ते संलग्न आहे,“आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी” हे विवेकवाहिनीचे ब्रीद वाक्य आहे. विवेक वाहिनीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यानी नियमित व्यायाम, नियमित ललित व वैचारिक ग्रंथाचे वाचन, वर्षातून एकदा तरी खादीचे कापड घेणे, निर्व्यसनी राहणे, आणि दर महिन्यास होणारया बैठकीस उपस्थित राहून समस्यांवर चर्चा करून विधायक विचार व विधायक कृती करणे अपेक्षित आहे असे ते म्हणाले
विवेकवाहिनीचे तत्वज्ञान कोणताही धर्म नसून वैज्ञानिक दृष्टिकोण आहे व त्यावर आधारित मूल्यात्मक विचार म्हणजेच विवेक होय. भारतीयत्व घडवण्यासाठी विवेकवाहिनी महत्वाची ठरत आहे. भारतीय संविधानाच्या स्वप्नातील भारत उभा करण्यासाठी विवेकवादी विद्यार्थी हवे आहेत, धर्मांध किंवा अविवेकी विद्यार्थी देशात खून, जाळपोळ,बलात्कार, चोऱ्या किंवा बाँम्बस्फोट अशा कारवाया करत आहेत. स्वत:च्या व जगाच्या प्रश्नांची जाणीव होऊन, विवेकी प्रगल्भतेने देशात व जगात सुखी जीवन जगण्यासाठी विवेकवाहिनी उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र पुरोगामी राज्य असले तरी, अनेक अविवेकी घटना या राज्यात घडत आहेत म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक महाविद्यालयात विवेकवाहिन्या उभ्या कराव्यात, असे आवाहनही त्यानी केले
प्रदीप शिंदे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन एवढेच विवेकवाहिनी करत नसून जगण्याच्या प्रत्येक प्रश्नांचा विचार विवेक वाहीनीत करणे आवश्यक असते, असे मत व्यकत केले, प्रभारी प्राचार्य प्रा राजेंद्र देशमुख म्हणाले की भारतीय लोकांकडे ज्ञान पूर्वीपासून आहे, ते आपण तपासून घेतले पाहिजे त्यासाठी संशोधनवृत्ती वाढीस लागली पाहिजे.
व्याख्यानाच्या प्रारंभी विवेकवाहिनीच्या कार्याध्यक्षा प्रा राणी शिंदे यांनी प्रास्ताविक केले, विवेकवाहिनीच्या कार्यकर्त्या विद्यार्थिनी कु.रिया मोरे व प्रा दीपाली पोळ यानी सूत्र संचालन केले, परिचय कु.शीतल ठोंबरे हिने करून दिला तर कु.कार्तिकी भोसले हिने आभार मानले, या कार्यक्रमास प्रा. तृप्ती नाईक, प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते