Vivo Mobiles : 12GB रॅम, 6,000mAh बॅटरीसह Vivo ने लाँच केले 2 नवे मोबाईल

Vivo Mobiles
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Vivo Mobiles । प्रसिद्ध मोबाईल निर्माता ब्रँड Vivo ने आपले २ नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Vivo Y50m 5G आणि Vivo Y50 5G असं या दोन्ही मोबाईलची नावे असून हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या Y सिरीज अंतर्गत लाँच झाले आहेत. यामध्ये तुम्हाला 12GB रॅम, 6,000mAh बॅटरीसह अनेक भन्नाट फीचर्स बघायला मिळतील. मोबाईलचा लूक सुद्धा अतिशय आकर्षक आहे. आज आपण या दोन्ही हँडसेटचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

डिस्प्ले –

Vivo Y50m 5G आणि Vivo Y50 5G या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.74-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720×1,600 पिक्सेल रिझोल्यूशन, 1,000 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6300 5G चिपसेट बसवण्यात आली आहे. हे दोन्ही मोबाईल एकूण ३ स्टोरेज व्हॅरियन्ट मध्ये लाँच करण्यात आले असून तुम्हाला यात जास्तीत जास्त 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. दोन्ही मॉडेल्स अँड्रॉइड आधारित OriginOS 5 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतात.

कॅमेरा – Vivo Mobiles

मोबाईलच्या (Vivo Mobiles) कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y50m 5G आणि Vivo Y50 5G च्या पाठीमागील बाजूला एकच 13MP चा कॅमेरा आहे, ज्यामध्ये f/2.2 अपर्चर आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 5MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 6,000mAh बॅटरी बसवण्यात आली आहे. हि बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर, हा मोबाईल 52 तासांपर्यंत टॉकटाइम देऊ शकतो.

अन्य फीचर्स?

इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं झाल्यास, या दोन्ही स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 5G सपोर्ट, ब्लूटूथ 5.4, वाय-फाय, GPS, Beidou, GLONASS, Galileo, QZSS, 3.5mm ऑडिओ जॅक, OTG आणि USB टाइप-C सारखे पर्याय मिळतील. सुरक्षेसाठी, मोबाईल मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सुविधा आहे. (Vivo Mobiles)

किंमत किती?

Vivo Y50 5G 4GB + 128GB – CNY 1,199 (सुमारे 13,000 रुपये)

Vivo Y50m 5G 6GB+128G- CNY 1,499 (अंदाजे 18,000 रुपये )

Vivo Y50m 5G 8GB+256GB – CNY 1,999 (अंदाजे 23,000रुपये )

Vivo Y50m 5G 12GB+256GB – CNY 2,299 (अंदाजे 26,000 रुपये ) हे दोन्ही मोबाईल सध्या चीनमध्ये लाँच झाले आहेत.