Vivo S19 सिरीज अंतर्गत लाँच झाले 2 नवे मोबाईल; 50MP कॅमेरा,16GB रॅमसह मिळतात भन्नाट फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल ब्रँड विवो ने आपल्या S19 सिरीज अंतर्गत २ नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. Vivo S19 आणि Vivo S19 Pro असे या दोन्ही मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा,16GB रॅमसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. हे दोन्ही मोबाईल सध्या चिनी बाजारपेठेत लाँच करण्यात आले असून येत्या काळात ते भारतात सुद्धा दाखल होऊ शकतात. आज आपण या दोन्ही मॉडेलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

6.78-इंचाचा डिस्प्ले –

Vivo S19 आणि Vivo S19 Pro या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 4500 Nits पीक ब्राईटनेस मिळतो. Vivo S19 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर बसवण्यात आलाय तर Vivo S19 Pro मध्ये Dimensity 9200+ प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही मोबाईलच्या कॅमेरामध्येही फरक पाहायला मिळतोय. Vivo S19 मध्ये 50MP + 8MP चा ड्युअल कॅमेरा आहे तर समोरील बाजूला 50MP चा सेल्फी कॅमेरा आहे. दुसरीकडे Vivo S19 Pro मध्ये 50MP Sony IMX921 लेन्स, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP टेलिफोटो लेन्ससह तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

Vivo ने दोन्ही मॉडेल्स प्रत्येकी चार कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केले आहेत. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम + 256GB स्टोरेज आहे. तर टॉप वेरिएंटमध्ये 16GB रॅम + 512GB स्टोरेज आहे. Vivo S19 मध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे तर Vivo S19 Pro मध्ये 5500mAh बॅटरी मिळतेय. या दोन्ही मोबाईलच्या बॅटरी 80W चार्जिंला सपोर्ट करतात.

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Vivo S19 ची किंमत 2500 Yuan म्हणजेच अंदाजे 28,797 रुपयांपासून सुरु होते. तर Vivo S19 Pro ची किंमत 3300 युआन म्हणजेच जवळपास 38 हजार रुपयांपासून सुरु होते. Vivo S19 हा मोबाईल राखाडी, पीच आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे तर Vivo S19 Pro ग्रे, हिरवा आणि फिकट निळ्या रंगात तुम्ही खरेदी करू शकता.