फक्त 4000 रुपयांत खरेदी करा 16MP सेल्फी कॅमेरावाला मोबाईल; Flipkart वर भन्नाट ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर नवीन मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल पण तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर चिंता करू नका.. हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका मोबाईल बद्दल आणि त्याच्यावर असलेल्या ऑफर बद्दल सांगणार आहोत ज्याअंतर्गत तुम्ही अवघ्या 4000 रुपयांतच हा मोबाईल घरी घेऊन जाऊ शकता. होय, हे खरं आहे.. Vivo T2 Pro 5G असं या स्मार्टफोनचं नाव असून प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर या मोबाईल खरेदीवर अनेक भन्नाट ऑफर देण्यात आल्यात. त्यामुळे तुमच्या खिशात कमी पैसे असले तरी तुम्ही अगदी स्वस्तात हा मोबाईल खरेदी करू शकता. चला तर जाणून घेऊयात, या मोबाईल वरील सर्व ऑफर जाणून घेऊयात …

Flipkart वर , Vivo T2 Pro 5G मोबाईल हा 27,999 रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे. मात्र यावर सुरुवातीपासूनच 14% डिस्काउंट देण्यात आला असून हा मोबाईल 23,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच ग्राहकांना HDFC आणि Flipkart Axis बँक कार्ड्सवर 2000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. Flipkart Axis Bank कार्डवर 5% कॅशबॅक सुद्धा मिळतोय. महत्वाची आणि खास बाब म्हणजे या मोबाईल वर एक्सचेंज ऑफर सुद्धा आहे. त्यानुसार तुमच्याकडे जर जुना मोबाईल असेल तर त्याबदल्यात तुम्हाला तब्बल 19650 रुपयांपर्यंत सूट मिळतेय. परंतु तुमचा जुना मोबाईल त्यांसाठी चांगल्या कंडिशन मध्ये असावा. याशिवाय तुम्ही 4000 रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआय ऑप्शनच्या माध्यमातून सुद्धा हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Vivo T2 Pro 5G चे फीचर्स पहा –

Vivo T2 Pro 5G मध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा फुल HD + प्लस 3D कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्युशन आणि 1300 निट्स पीक ब्राइटनेस मिळते. कंपनीने या हँडसेटमध्ये MediaTek डायमेंशन 7200 चिपसेट वापरली असून हा मोबाईल 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास विवोच्या या स्मार्टफोन मध्ये 64MP मुख्य कॅमेरा आणि 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. तर पॉवरसाठी मोबाईलमध्ये 4600 mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.