हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी विवोने आपल्या ग्राहकांसाठी भारतीय बाजारपेठेत नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo T3 Ultra 5G असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा, 12GB रॅम, 5500mAh बॅटरी यांसारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. विवोचा हा मोबाईल 8GB आणि 12GB रॅम मध्ये लाँच झाला असून त्याच्या किमतीही त्यानुसार वेगवेगळ्या आहेत. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत सविस्तर जाणून घेऊयात….
Vivo T3 Ultra 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा 3D कर्व्ड एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. 1.5K रिझोल्यूशन आणि 4500Nits पीक ब्राईटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 9200+ प्रॉसेसर बसवला असून विवो चा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Funtouch OS 14 वर काम करतो. हा स्मार्टफोन 8GB RAM + 128GB, 8GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे.
कॅमेरा- Vivo T3 Ultra 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo T3 Ultra 5G मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा आणि + 8MP चा सेकंडरी कॅमेरा बसवण्यात आला आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 80W चार्जिंगला सपोर्ट करते. धूळ आणि पाणीपासून संरक्षण करण्यासाठी हा मोबाईल IP68 रेटिंग सह येतो. तसेच डिव्हाइसच्या संरक्षणासाठी मोबाईल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. मोबाईल सोबत ग्राहकांना दोन वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि तीन वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स मिळतील.
किंमत किती?
मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, या मोबाईलच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे तर 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 35,999 रुपये आहे. हो मोबाईल ग्रे आणि ग्रीन रंगात उपलब्ध आहे. तुम्ही 19 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट वरून, कंपनीच्या वेबसाइट वरून किंवा इतर ऑफलाइन स्टोअरमधून हा मोबाईल खरेदी करू शकता.