Vivo T3x 5G: विवोने 12,999 रुपयांत लाँच केला 5G मोबाईल; 6000mAh बॅटरीसह मिळतात खास फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात Vivo T3x 5G च्या रूपाने विवो ने नवीन 5G मोबाईल लाँच केला आहे. या मोबाईलची सुरुवातीची किंमत अवघ्या 12,999 रुपयांपासून सुरु होत आहे. किंमत कमी असली तरी या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. येत्या 24 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येईल. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊयात…

Vivo T3x 5G मध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा फुल HD +डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेला 1000 nits ची पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. मोबाईल मध्ये Snapdragon 6 Gen 1 चिपसेट बसवण्यात आली असून विवो चा हा मोबाईल IP64 रेटिंगसह येतो. म्हणजेच धूळ आणि पाण्यापासून त्याला पूर्णपणे संरक्षण मिळते. हा स्मार्टफोन फोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

कॅमेरा – Vivo T3x 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo T3x 5G मध्ये पाठीमागील बाजूला 50MPचा मुख्य कॅमेरा, 2MP चा सेकंडरी कॅमेरा देण्यात आलाय तर समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 6000mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईल मध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि 3.5mm ऑडिओ जॅक फीचर्स मिळते.

किंमत किती?

Vivo T3x 5G च्या 4GB + 128GB स्टोरेज व्हेरियेण्टची किंमत 13,999 रुपये, 6GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 14,999 रुपये आणि 8GB + 128GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 16,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 24 एप्रिल पासून फ्लिपकार्ट आणि विवो ई-स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. तुम्ही HDFC आणि SBI कार्डवर मोबाईल खरेदी केल्यास 1500 रुपयांची सवलत मिळेल.