हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Vivo T4 Lite 5G । आघाडीची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने भारतीय ग्राहकांना परवडेल अशा कमी किमतीत नवा मोबाईल लाँच केला आहे . Vivo T4 Lite 5G अस या स्मार्टफोनचे नाव असून यात अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. भारतात अनेक असे ग्राहक आहेत ज्यांना १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मोबाईल घ्यायचा असतो, अशा ग्राहकांसाठी हा मोबाईल बेस्ट पर्याय ठरेल कारण याची किंमत ९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. आज आपण विवोच्या या 5G स्मार्टफोनचे काहीस फीचर्स जाणून घेणार आहोत.
डिस्प्ले –
Vivo T4 Lite 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.74-इंचाचा HD+ डिस्प्ले बसवण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1000 nits पीक ब्राइटनेससह येतो. कंपनीने या 5G मोबाईलमध्ये Octa Core MediaTek Dimensity 6300 6nm प्रोसेसर बसवला आहे. त्यानुसार, हा स्मार्टफोन 4GB / 6GB / 8GB अशा ३ पर्यायात लाँच करण्यात आला आहे.
कॅमेरा – Vivo T4 Lite 5G
मोबाईलच्या कॅमेऱ्याबद्दल झाल्यास, Vivo T4 Lite 5G मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5MP चा फ्रॅम्ट कॅमेरा उपलब्ध आहे. मोबाईल मध्ये ६०००mAh ची दमदार बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी १५W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ३.५ मिमी ऑडिओ जॅक, टॉप-पोर्टेड आहे. हे डिव्हाइस ५जी, वाय-फाय ८०२.११ एसी यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
किंमत किती?
Vivo T4 Lite 5G च्या ४GB + १२८GB मोबाईलची किंमत ९,९९९ रुपये आहे. ६GB + १२८GB मॉडेलसाठी १०,९९९ रुपये आहे तर टॉप व्हेरियंट असलेल्या ८GB + २५६GB मॉडेलची किंमत अवघी १२,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन निळ्या आणि सोनेरी रंगात लाँच करण्यात आला आहे. येत्या २ जुलैपासून प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट, Vivo इंडिया ऑनलाइन स्टोअर आणि ऑफलाइन स्टोअरमधून तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकाल. कंपनी एचडीएफसी बँक, एसबीआय आणि अॅक्सिस बँक कार्डसह फोन खरेदी करण्यासाठी ५०० रुपयांची सूट देखील देत आहे.




