Vivo V30 Lite 5G : 8GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Vivo ने लाँच केला नवा स्मार्टफोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने जागतिक बाजारात नवा मोबाईल लाँच केला आहे. Vivo V30 Lite 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 8GB RAM आणि 5000mAh बॅटरी सारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. दिसायला अतिशय आकर्षक लूक असलेला हा स्मार्टफोन ग्राहकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही. आज आपण विवोच्या मोबाईलचे खास फिचर आणि किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

6.67-इंचाचा डिस्प्ले –

Vivo V30 Lite 4G मध्ये 6.67-इंचाचा FHD+ E4 AMOLED डिस्प्ले डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येत असून यामध्ये 1800 निट्स पीक ब्राईटनेस मिळतो. कंपनीने या मोबाईलमध्ये Qualcomm Snapdragon 685 प्रोसेसर दिला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Funtouch OS 14 वर काम करतो.

50MP कॅमेरा – Vivo V30 Lite 5G

मोबाईलच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल सांगायचं झाल्यास, Vivo V30 Lite 4G मध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 2MP चा सेकंडरी कॅमेरा आणि समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 80W चार्जिंगला सपोर्ट करते. खास बाब म्हणजे फोन IP54 रेटिंग सह येतो म्हणजेच धूळ आणि पाण्यापासून मोबाईलला कोणताही धोका निर्माण होणार नाही.

किंमत किती ?

Vivo ने हा स्मार्टफोन रशिया आणि कंबोडियामध्ये लॉन्च केला आहे. रशियामध्ये, ब्रँडने 8GB RAM + 128GB स्टोरेज प्रकार लॉन्च केला आहे. तर कंबोडियामध्ये 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएन्ट ,मध्ये लॉन्च केला आहे. हा मोबाईल रशियामध्ये RUB 24,999 (अंदाजे 22,512 रुपये) आणि कंबोडियामध्ये KHR 12 लाख (अंदाजे 24,717 रुपये) मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ग्राहकहा मोबाईल हिरव्या आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात.