Vivo V30 : 50MP कॅमेरासह Vivo ने लाँच केला नवा मोबाईल; पहा डिटेल्स

Vivo V30 mobile
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vivo V30 : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने जागतिक बाजारात नवा मोबाईल लाँच केला आहे. Vivo V30 असे या मोबाईलचे नाव असून जा स्मार्टफोन म्हणजे Vivo S18 चे अपडेटेड व्हर्जन आहे. हा स्मार्टफोन भारत, इंडोनेशिया, हाँगकाँग, मलेशिया, सिंगापूर, थायलंड आणि UAE सारख्या 30 देशांमध्ये आणला जाणार आहे. कंपनीने या मोबाईलची किंमत अजून जाहीर केली नसली तरी याचे फीचर्स मात्र समोर आले आहेत. आज आपण याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात…

6.78 इंच डिस्प्ले –

Vivo V30 स्मार्टफोन कंपनीने 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंच, कर्व्ह AMOLED डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेला 1280 x 2800 पिक्सेल रेझोल्यूशन मिळते. कंपनीने या मोबाईलमध्ये Snapdragon 7 Gen 3 चिपसेट बसवली असून vivo चा हा मोबाईल FunTouch OS 14 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. या स्मार्टफोनची जाडी 7.45 मिमी आणि वजन 186 ग्रॅम आहे.

कॅमेरा – Vivo V30

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झालयास, Vivo V30 मध्ये मोबाईलच्या पाठीमागील बाजूला 50MP मुख्य कॅमेरा आणि 50MP चा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि देण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉल साठी समोरील बाजूला सुद्धा 50MP चा फ्रंट कॅमेरा बसवण्यात आला आहे. कंपनीकडून या मोबाईल मध्ये 4 वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स दिले जात आहेत.

स्टोरेज किती?

Vivo V30 हा मोबाईल 8 GB RAM + 128 GB स्टोरेज, 8 GB RAM + 256 GB स्टोरेज, 12 GB RAM + 256 GB स्टोरेज आणि 12 GB RAM + 512 GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये सादर केला आहे. Vivo V30 मध्ये 5,000mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.