Vivo V30e : Vivo ने लाँच केला सर्वात स्लिम मोबाईल; मिळतात भन्नाट फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात Vivo कंपनीचे मोबाईल जास्त प्रसिद्ध आणि ग्राहकांना आवडणारे असे असतात. विवोच्या स्मार्टफोनला मार्केटमध्ये मोठी पसंती पाहायला मिळते. कंपनीसुद्धा ग्राहकांच्या गरजा पाहून नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असे मोबाईल बाजारात लाँच करत असते. आताही विवोने भारतीय बाजारात Vivo V30e नावाचा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा मोबाईल अतिशय स्लिम असून वजनाला हलका फुलका आहे. तसेच यामध्ये 8GB RAM आणि 50MP कॅमेरा सारखी अनेक खास अशी वैशिष्ठे देण्यात आली आहे. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…..

6.78-इंचाचा डिस्प्ले-

Vivo V30e स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा फुल HD + कर्व्ह AMOLED डिस्प्ले देण्यात आला मोबाईलची जाडी अवघी 7.65 mm असून विवोचा हा स्मार्टफोन अतिशयम स्लिम आहे. मोबाईलचे वजन 190 ग्राम आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये Qualcomm चा Snapdragon 6 Gen 1 SoC आणि Adreno GPU प्रोसेसर दिला असून हा मोबाईल Android 14 आधारित Funtouch OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. हा मोबाईल 8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच झाला आहे.

कॅमेरा – Vivo V30e

मोबाईलच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल सांगायचं झाल्यास, Vivo V30e च्या पाठीमागील बाजूला 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला 50MP चा मजबूत असा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5,500mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 44W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

अन्य फीचर्स –

Vivo V30e मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, GPS आणि USB टाइप-सी पोर्ट यांसारखे फीचर्स मिळतात.

किंमत आणि ऑफर-

Vivo V30e च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 27,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 29,999 आहे. तुम्ही जर SBI आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवरून मोबाईल खरेदी केल्यास तुम्हाला 3,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळतोय. ग्राहक हा मोबाईल लाल आणि निळ्या रंगात खरेदी करू शकतात.