विविध फीचर्स आणि दमदार बॅटरीसह Vivo V50 स्मार्टफोन लाँच; त्वरीत जाणून घ्या किंमत

0
1
Vivo V50
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विवोच्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. Vivo ने आज भारतात आपला नवीन Vivo V50 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन मागील Vivo V40 चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. कंपनीने आकर्षक डिझाइन, प्रीमियम फीचर्स आणि दमदार बॅटरीसह हा फोन लाँच केला आहे. Vivo च्या ‘V’ सिरीजमधील हा यंदाचा पहिला फोन आहे. त्यामुळे खरेदीपूर्वी जाणून घ्या सर्व माहिती.

प्रभावी डिस्प्ले आणि प्रीमियम डिझाइन

Vivo V50 मध्ये 6.78-इंचाचा क्वाड-कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. जो Diamond Shield Glass Protection सह येतो. हा डिस्प्ले अधिक सुरक्षित आणि टिकाऊ आहे. या फोनला IP68 व IP69 रेटिंग मिळाले आहे. हा फोन टायटॅनियम ग्रे, रोझ रेड आणि स्टारी ब्लू या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

AI-आधारित स्मार्ट फीचर्स

Vivo ने या फोनमध्ये अनेक AI फीचर्स दिले आहेत. तसेच, यामध्ये Circle to Search, AI Transcript आणि AI Live Call Translation यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. हे फीचर्स वापरकर्त्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये संभाषण करण्यास मदत करतात. तसेच, त्वरित माहिती शोधून देतात.

खास म्हणजे, Vivo V50 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 हा अत्याधुनिक प्रोसेसर देण्यात आला आहे. जो 12GB RAM सह येतो. हे कॉम्बिनेशन मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी प्रभावी ठरते. कॅमेराच्या बाबतीत, या फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा OIS सपोर्टसह आणि 50MP अल्ट्रावाइड लेन्स आहे. तसेच, सेल्फीप्रेमींसाठी 50MP चा ऑटोफोकस फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यात Wedding Portrait Studio फीचर आहे.

दमदार बॅटरी आणि जलद चार्जिंग

Vivo V50 मध्ये 6,000 mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे ती 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कंपनीच्या मते, हा बॅटरी असलेला सर्वात पातळ फोन आहे, त्यामुळे तो डिझाइन आणि परफॉर्मन्स या दोन्हींसाठी आकर्षक ठरतो.

किंमत

Vivo V50 ची किंमत 34,999 पासून सुरू होत आहे, तर 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 36,999 किंमत ठेवण्यात आली आहे. या फोनसाठी ग्राहक आजपासून प्री-बुकिंग करू शकतात. कारण, 25 फेब्रुवारीपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. Vivo चा हा नवीन स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत ई-स्टोअर व्यतिरिक्त Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध असेल.