Vivo X Fold 3 Pro : Vivo ने लाँच केला पहिलावाहिला फोल्डेबल मोबाईल; किंमत पाहून व्हाल हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने भारतीय बाजारात आपला पहिलावहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo X Fold 3 Pro असे या मोबाईलचे नाव असून बाजारात हा मोबाईल Oppo आणि Samsung च्या फोल्डेबल मोबाईलला टक्कर देईल. खास बाब म्हणजे क्वालकॉम स्नैपड्रैगन 8 जेनरेशन 3 प्रोसेसर सह लाँच करण्यात आलेला हा देशातील पहिलाच मोबाईल आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर पण जाणून घेऊयात …..

Vivo X Fold 3 Pro मध्ये 8.03 इंचाचा AMOLED फोल्डेबल डिस्प्ले देण्यात आला असून हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. या डिस्प्लेला 2200 x 2480 पिक्सेल रिझोल्यूशन, 90.5 टक्के स्क्रीन बॉडी रेशो आणि 4500 nits पीक ब्राईटनेस मिळतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 (4 nm) प्रोसेसर बसवण्यात आलाय.

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo X Fold 3 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50 MP चा मुख्य कॅमेरा, 64 MP सेकंडरी कॅमेरा आणि 50MP चा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये 5700 mAh ची बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 100W वायर फास्ट चार्जरला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे कि अवघ्या 31 मिनिटांत ही बॅटरी 100% चार्ज होण्यास सक्षम आहे.

किंमत किती? Vivo X Fold 3 Pro

विवोच्या या पहिल्यावहिल्या फोल्डेबल मोबाईलची किंमत 1,59,999 रुपये आहे. येत्या १३ जूनपासून स्मार्टफोनच्या विक्रीला सुरुवात होणार असून मोबाईल खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर सुद्धा देण्यात आल्यात. मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांनी HDFC बँक किंवा SBI कार्डचा वापर केल्यास 15,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळतो. याशिवाय 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस सुद्धा कंपनीने जाहीर केला आहे