Vivo Y200i : विवोने 50MP कॅमेरा, 6,000 mAh बॅटरीसह लाँच केला नवा मोबाईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने चिनी बाजारात Vivo Y200i स्मार्टफोन लाँच केला आहे. 50MP कॅमेरा, 6,000 mAh बॅटरीसह या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाईलची किंमत सुद्धा सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी अशीच आहे. आज आपण विवोच्या या नव्या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किमतीबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

6.72 इंच डिस्प्ले –

Vivo Y200i मध्ये कंपनीने 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.72 इंच फुल HD + LCD डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेला 1,080 x 2,408 पिक्सेल रिझोल्युशन आणि 339 ppi पिक्सेल घनता मिळते. कंपनीने या मोबाईल मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर दिला असून Android 14-आधारित OriginOS या ऑपरेटिंग सिस्टीम वर विवोचा हा स्मार्टफोन चालतो.

50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा – Vivo Y200i

मोबाईलच्या कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, Vivo Y200i मध्ये पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 6,000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 44 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 4G, 5G, Wi-Fi, Bluetooth, GPS आणि USB Type-C पोर्टचे कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. तर सुरक्षेसाठी यात बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

किंमत किती –

आता राहिला प्रश्न तो म्हणजे मोबाईलच्या किमतीचा… तर Vivo Y200i च्या 8 GB + 256 GB व्हेरिएंटची किंमत CNY 1,599 (अंदाजे 18,000 रुपये ), 12 GB + 256 GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत CNY 1,799 (अंदाजे 21,200 रुपये ) आणि 12 GB + 512 GB मॉडेलची किंमत 23,500 रुपये आहे ) . हा मोबाईल तुम्ही ग्लेशियर व्हाइट, स्टाररी नाईट आणि व्हॅस्ट सी ब्लू रंगांमध्ये खरेदी करू शकता.