Vivo Y300 Pro 5G : 50MP कॅमेरा, 6500mAh बॅटरीसह Vivo चा मोबाईल लाँच; किंमत किती पहा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल निर्माता कंपनीVivo ने चिनी बाजारात Vivo Y300 Pro 5G नावाचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. 50MP कॅमेरा, 6500mAh बॅटरीसह या मोबाईल मध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. एकूण ४ व्हॅरिएंट मध्ये हा हँडसेट लाँच करण्यात आला असून त्याची किंमत सुद्धा त्यानुसार वेगवेगळी आहे. सध्यातरी चीनमध्ये मोबाईलचे लौंचिंग झालं असलं तरी लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सुद्धा येण्याची शक्यता आहे. आज आपण विवोच्या या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

6.77 इंचाचा डिस्प्ले –

Vivo Y300 Pro मध्ये 60Hz, 90Hz आणि 120Hz दरम्यानच्या रिफ्रेश रेटसह 6.77 इंचाचा फुल-एचडी+AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1080×2392 पिक्सेल रिझोल्युशन आणि 5000 nits ची पीक ब्राईटनेस मिळते. कंपनीने मोबाईल मध्ये 4nm स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 चिपसेट वापरली असून विवोचा हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित OriginOS 4 वर काम करतो. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी फोन IP65 रेटिंगसह येतो.

कॅमेरा – Vivo Y300 Pro 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y300 Pro मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 6500mAh ची महाशक्तीशाली बॅटरी आहे. हि बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. विवोच्या या मोबाईल मध्ये ब्लूटूथ 5.1, GPS/AGPS, BeiDou, GLONASS, Galileo, QZSS आणि Wi-Fi सारखी अन्य वैशिष्ट्ये आहेत.

किंमत किती?

हा स्मार्टफोन एकूण ४ स्टोरेज व्हेरियंटमध्ये येतो. यातील 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत CNY 1,799 (अंदाजे 21,000 रुपये) आहे. 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत CNY 1,999 (अंदाजे 23,000 रुपये) आहे. 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत CNY 2,199 (अंदाजे रु. 26,000) आहे. तर 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत CNY 2,499 (अंदाजे 29,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा मोबाईल काळ्या, सोनेरी, पांढरा आणि टायटॅनियम रंगाच्या पर्यायात येतो.