Vivo Y36c : 50MP कॅमेरा, 12GB रॅमसह Vivo ने लाँच केला नवा मोबाईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने चिनी बाजारात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Y36c असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा, 12GB रॅमसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. सध्या तरी चीनमध्ये हा मोबाईल लाँच झाला असला तरी लवकरच तो भारतात सुद्धा येण्याची शकयता आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

फीचर्स

Vivo Y36c फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 840 nits पीक ब्राईटनेस मिळतो. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट बसवली असून विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम ते 12जीबी रॅम पर्यंतची मेमरी देण्यात आली आहेत. तसेच स्टोरेजमध्ये 256GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे.

कॅमेरा –

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y36c च्या पाठीमागील बाजूला 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली आहे. खास बाब म्हणजे विवोच्या या स्मार्टफोनमध्ये IP54 रेटिंग देण्यात आलं आहे जे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करते.

किंमत किती?

Vivo चा नवीन Vivo Y36c च्या 6 GB रॅम, 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 899 युआन (अंदाजे 10,500 रुपये ) आहे. तर टॉप वेरिएंट असलेल्या 12 GB रॅम, 256 GB स्टोरेजची किंमत 1299 युआन (अंदाजे रुपये 15,500) आहे. कंपनीने हा स्मार्टफोन मून शॅडो ब्लॅक, डिस्टंट माउंटन ग्रीन आणि डायमंड पर्पल या तीन कलर व्हेरियंटमध्ये आणला आहे.