हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Y58 5G असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरासह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. विवोने हा स्मार्टफोन 19,499 रुपये किमतीत बाजारात आणला असून फ्लिपकार्ट वरून तुम्ही तो खरेदी करू शकता. आज आपण विवोच्या या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊयात…
Vivo Y58 5G मध्ये मोठा 120Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आलाय. हा डिस्प्ले 1024 nits पीक ब्राइटनेस आणि 2.5D सपोर्टसह येतो. मोबाईलचे वजन 199 ग्रॅम असून यामध्ये IP64 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स आहे. म्हणजेच धूळ आणि पाण्यापासून मोबाईलला कोणताही धोका नाही. विवोचा हा स्मार्टफोन Android 14 आधारित Funtouch OS 14 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.
कॅमेरा – Vivo Y58 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y58 5G मध्ये 50MP मुख्य कॅमेरा आहे. आणि 2MP बोकेह कॅमेरा देण्यात आलाय, तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. मोबाईलला ड्युअल व्ह्यू व्हिडिओ फीचर देण्यात आले आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये AI लो-लाइट इमेज क्वालिटी उपलब्ध आहे. पॉवरसाठी 6000mAh बॅटरी मिळत असून हि बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
Vivo चा हा स्मार्टफोन 8GB RAM + 128GB स्टोरेज मध्ये लाँच कऱण्यात आला असून त्याची किंमत 19,499 रुपये आहे. हा हँडसेट निळ्या आणि हिरव्या रंगात उपलब्ध असून ग्राहक फ्लिपकार्ट, विवो इंडिया ई-स्टोअर वर हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.