हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे महागड्या रिचार्ज प्लॅनच्या किमतींनी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चाप लागला असतांनाच आता वोडाफोन- आयडियाने आपल्या ग्राहकांना (Vodafone Idea Recharge Plan) आणखी एक मोठा झटका दिला आहे. कंपनीने आपल्या २ लोकप्रिय रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना याच्यापेक्षा थोडे कमी दिवस रिचार्ज प्लानचा लाभ घेता येईल. वोडाफोन आयडियाने ज्या २ रिचार्जची व्हॅलिडिटी कमी केली आहेत त्यातील एक आहे तो म्हणजे 666 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आणि दुसरा आहे तो म्हणजे 479 रुपयांचा रिचार्ज प्लॅन… चला तर या दोन्ही प्लॅनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
479 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –
Vodafone Idea च्या 479 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना यापूर्वी 56 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती. परंतु आता मात्र ग्राहकांना फक्त 48 दिवसांची वैधता मिळणार आहे. इंटरनेटच्याबाबतीत सांगायचं झाल्यास आधीसारखंच यामध्ये दररोज 1GB इंटरनेट डेटा वापरता येईल. याशिवाय, 479 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला 100 SMS चा आनंद सुद्धा घेता येईल. रोजचे इंटरनेट संपल्यानंतर यूजर्स 64Kbps वेगाने इंटरनेट वापरू शकतात.
666 रुपयांचा रिचार्ज प्लॅन-
666 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी सुद्धा Vodafone Idea ने कमी केली आहे. खरं तर यापूर्वी हा रिचार्ज प्लॅन 77 दिवसांच्या वैधतेसह येत होता, मात्र आता यामध्ये मोठी घट करण्यात आली आहे. त्यानुसार इथून पुढे यूजर्सना 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त 64 दिवसांचीच व्हॅलिडिटी मिळेल. या रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना दररोज 1.5GB पर्यंत इंटरनेट डेटा चा आनंद घेता येईल. Vodafone Idea ने आपल्या रिचार्जची व्हॅलिडिटी कमी केल्याने ग्राहकांच्या खिशावर त्याचा थेट परिणाम होणार हे निश्चित.