Voter Awareness: 20 हजार कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना दिले जाणार निवडणुकीचे प्रशिक्षण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Voter Awareness | पुढील एप्रिल महिन्यापासून लोकसभा निवडणुका (Loksabha Election) सुरू होणार आहेत. त्यामुळे यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. याअंतर्गत आज 378 क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे जिल्हा नियोजन भवनमध्ये प्रशिक्षण घेतले जाईल. निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे आठ ते दहा मतदार केंद्राची जबाबदारी सोपवण्यात येते. या जबाबदारीमध्ये काही चूक झाल्यास याचे मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडावी? कामाचे नियोजन कसे असावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येते.

20 हजार शिक्षक घेणार प्रशिक्षण (Voter Awareness)

हेच मार्गदर्शन प्रशिक्षण येत्या 6 ते 9 एप्रिल अशा चार दिवसांमध्ये वीस हजार कर्मचाऱ्यांसह घेतले जाणार आहे. या 20 हजार कर्मचाऱ्यांना तीन वेळा प्रशिक्षण दिले जाईल. याचा दुसरा टप्पा एप्रिलमध्येच पार पडेल. या प्रशिक्षणामार्फत अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडावी, याची माहिती देण्यात येईल. तसेच. मतदान कसे करून घ्यावे, ईव्हीएमची खबरदारी, मतदार यादी व हाताला शाई लावणे, मतदान केंद्रावरील कार्यपद्धती अशा सर्व बाबी शिकवल्या जातील. मुख्य म्हणजे, हे प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वीच सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे पेपर ही संपतील. त्यामुळे प्रशिक्षणावेळी कोणताही अडथळा येणार नाही.

दरम्यान सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 3 हजार 617 मतदान केंद्रे आहेत. यामधील 1 हजार 243 केंद्रे शहरी भागात आहेत तर 2356 केंद्रे ग्रामीण भागामध्ये स्थित आहेत. या सर्व केंद्रांची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे, त्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण दिले जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रार करण्यासाठी आयोगाने c-vigil ऑनलाइन वेबसाईट सुरू केली आहे. (Voter Awareness) यासह 1950 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. परंतु नागरिकांना कोणतीही तक्रार करताना मोबाईलचे लोकेशन ऑन करावे लागणार आहे. जेणेकरून जिल्हा प्रशासनाच्या पथकाला लवकरात लवकर घटनास्थळाचा शोध घेता येईल.