Voter Awareness: VVPAT नेमके कसे काम करते? याचा फायदा तरी काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 19 एप्रिल ते 4 जून दरम्यान देशभरात लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. यंदाच्या वर्षी या निवडणुका एकूण 7 टप्प्यांमध्ये घेतल्या जातील. (Voter Awareness) मात्र त्यापूर्वीच न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान व्हीव्हीपीएटी स्लिप्सची मोजणी करता येऊ शकते का? याबाबत सरकारला उत्तर मागितले आहे. तसेच, विरोधकांनी देखील ईव्हीएमबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या VVPAT आणि EVM मशीनविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

VVPAT नेमके म्हणजे काय?(Voter Awareness)

देशातील निवडणूक प्रक्रिया सुलभ पद्धतीने पार पडावी यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणण्यात आले. परंतु, या EVM मशीनवर देखील विरोधकांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे EVM वरील विश्वासहार्ता वाढवण्यासाठी VVPAT म्हणजेच व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल हे आणले गेले. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झालेच तर, VVPAT हे EVM मशिनला जोडलेले एक लहान आकाराचे मशीन आहे. एखाद्या व्यक्तीने ईव्हीएमवर मतदान केले की VVPAT मधून एक पेपर स्लिप बाहेर येते. या स्लीपवर मतदाराने नेमके कोणाला मत दिली आहे हे पाहता येते. परंतु हा पेपर काही सेकंदासाठीच पाहता येतो नंतर तो पुन्हा VVPAT मध्ये जमा होतो.

VVPAT च्या माध्यमातून कोणताही मतदार आपण योग्य व्यक्तीला मत दिले आहे की नाही हे पाहू शकतो. VVPAT मधून येणारी स्लीप फक्त 7 सेकंदांसाठी दिसते. ही स्लीप EVM मशीनला जोडलेल्या बॅलेट पेपरमधून बाहेर पडते आणि VVPAT मधून बाहेर येते. यावर मतदाराने निवडलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक नाव आणि निवडणूक चिन्ह दिलेले असते. (Voter Awareness) यामुळे एखादा मतदार पुन्हा एकदा पाहू शकतो की त्याने नेमके कोणत्या उमेदवाराला मत दिले आहे.

सर्वात प्रथम 2010 साली निवडणूक आयोगाने VVPAT च्या वापराबद्दल चर्चा केली होती. EVM मशीनबाबत पारदर्शकता आणि विश्वास टिकून राहण्यासाठी VVPAT आणले गेले होते. ही मशीन बनवण्याची जबाबदारी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे देण्यात आली होती. सुरुवातीला दोन वर्षे निवडणूक आयोगाने VVPAT संदर्भात राजकीय पक्षांची चर्चा केली आणि त्यांच्याकडून सूचना मागवल्या. त्यानंतरच 2013 साली VVPAT ला संमती देण्यात आली.