Voter Awareness: एका EVM मशीनची किंमत किती असते? एका क्लिकवर वाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशीनचा (EVM Machine) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा भाग बनला आहे. (Voter Awareness) कारण की, आता देशात ईव्हीएम मशीनच्या माध्यमातूनच मतदान करण्यात येत आहे. या मशीनमुळे निवडणुकांचा खर्च कमी होतो, असे म्हणले जाते. त्यामुळे निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीन सर्वात महत्त्वाची होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण या मशीनची किंमत आणि ती बनवण्यासाठी लागणारा खर्च याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका M2 ईव्हीएमची किंमत 8,670 इतकी होती. परंतु आता M3 ईव्हीएम मशीनची किंमत अंदाज 17 हजार रुपये प्रति युनिट आहे. असे असले तरी मतपेटीतून करण्यात येणाऱ्या मतदानाच्या तुलनेने मशीनची किंमत कमी आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार ईव्हीएम मशीनऐवजी मतपेटीच्या मार्फत मतदान करण्यास जास्त खर्च येतो. मतपत्रिकांची छपाई, वाहतूक, तसेच इतर खर्च मतदान पेटीसाठी लागतो. (Voter Awareness) या तुलनेने ईव्हीएम मशीनसाठी कमी खर्च लागतो.

महत्त्वाचे म्हणजे, ईव्हीएम मशीन हे बॅटरीवर चालते. त्यामुळे वीज गेली असली तरी मतदान प्रक्रिया खंडित होत नाही. या मशीनमुळे कधीही कोणाला शॉक बसू शकत नाही. या मशीनची रचनात सर्व बाबींचा विचार करून करण्यात आली आहे. (Voter Awareness) दरम्यान, सर्वात प्रथम जेव्हा 1989-90 साली ईव्हीएम मशीन खरेदी करण्यात आल्या तेव्हा एका मशीनची किंमत 5500 रुपये इतकी होती. आता याचं मशीनची किंमत 17 हजारपर्यंत गेली आहे.