Voter Education: मतदान स्लिप ऑनलाइन कसे डाउनलोड करावे? लगेच प्रोसेस जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशात एकूण 7 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आली आहे. तर 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात येईल. त्यामुळे आपल्याला माहित असायला हवे ते मतदान करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असेल ते म्हणजे मतदान स्लिप. (Voter Education) या स्लिपशिवाय तुम्हाला मतदान करता येणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे मतदान स्लिप असणे आवश्यक आहे. ही मतदान स्लीप तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करून घेऊ शकता. याची प्रोसेस पुढे देण्यात आली आहे.

मतदान स्लीप डाऊनलोड करण्याची ऑनलाईन प्रोसेस (Voter Education)

  • सर्वात प्रथम NVSP च्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करा.
  • त्यानंतर Search in Electoral Roll वर या ऑप्शनवर क्लिक करा.
  • पुढे, ‘Search by Details’ किंवा ‘Search by Mobile’ यातील एक पर्याय निवडा.
  • त्यानंतर सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर Search वर क्लिक करा.
  • ही प्रोसेस केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर सादर केले जाईल.. यानंतर ‘View Details’ ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला मतदान केंद्र मतदानाची तारीख आणि इतर माहिती एका वेगळ्या पेजवर दिसेल.
  • यानंतर तुम्ही View Details’ वर क्लिककरून मतदान स्लिप डाउनलोड करू शकता.

ॲपवरुन कसे डाउनलोड करावे? (Voter Education)

  • प्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन व्होटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करा.
  • पुढे मोबाईल नंबर आणि पासवर्डद्वारे ॲप लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर ‘Search Your Name in Electoral Roll’ पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर ‘Search by Details’ किंवा ‘Search by EPIC No’ यातील एक पर्याय निवडा.
  • आता आवश्यक माहिती भरून सर्चवर क्लिक करा
  • असे केल्यास तुमची संपूर्ण माहिती पेजवर दिसेल ते डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड या ऑप्शनवर क्लिक करा.