हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजपासून देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवरच एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) एक मोठी घोषणा केली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने पहिल्यांदाच मतदारांसाठी तिकिटावर खास ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियामधून जे लोक मतदानासाठी आपल्या घरी जात आहे त्यांना विमान तिकिटावर 19 टक्क्यांपर्यंत मिळत आहे. ही सवलत फक्त एअर इंडियाकडून 18 ते 22 वर्षे वयोगटातील तरुण मतदानासाठी देण्यात आली आहे.
नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात Air India Express ने म्हटले आहे की, एअर इंडिया ने प्रवास करणाऱ्या मतदाराला संबंधित मतदारसंघाच्या जवळच्या विमानतळावर जाण्यासाठी ही ऑफर देण्यात येईल. ही ऑफर फक्त 18 एप्रिल ते 1 जून 2024 पर्यंत लागू असेल. या सवलतीअंतर्गत तिकिटाचे बुकिंग करण्यासाठी प्रवाशांनी https://www.airindiaexpress.com या वेबसाईटला भेट द्यावी. खास म्हणजे, जनतेमध्ये मतदान करण्यासंदर्भात जागृतता निर्माण व्हावी यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने #VoteAsYouAre मोहिम सुरू केली आहे.
सर्वात महत्त्वाचे बाब म्हणजे या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आपले ओळखपत्र दाखवावे लागेल. तसेच विमानतळावर बोर्डिंग पास घेताना देखील प्रवाशांना आपले ओळखपत्र दाखवावे लागेल. दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेसकडून ही ऑफर देशभरातील 31 ठिकाणी देण्यात आली आहे. ज्यात कोलकाता, लखनौ, श्रीनगर, रांची, पुणे, मुंबई, वाराणसी अमृतसर, अयोध्या, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, ग्वाल्हेर, हैदराबाद, मणिपूरचे इंफाळ, इंदूर, मध्य प्रदेशचे जयपूर, केरळचे कन्नूर, कोची आणि कोझिकोड अशा ठिकाणांचा समावेश आहे.