हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोग केव्हाही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकते. त्यादृष्टीने आयोगाकडून पाऊलेही उचलली जात आहेत. आयोगाचे अधिकारी प्रत्येक राज्यात जाऊन त्या त्या राज्यातील निवडणुकीच्या तयारीचे मूल्यांकन करत आहेत. त्यातच आता मतदानासंदर्भत एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात आता लोकसभा निवडणुकीसाठी घरात बसूनही मतदान (Voting From Home) करता येणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यानी म्हंटल, आता घरातून मतदान करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सर्वानाच हि सुविधा उपलब्ध नसेल, तर ८० वर्षांपेक्षा जास्त, दिव्यांग अशा मतदारांनाच घरी बसून मतदान करता येणार आहे. निवडणूक जाहीर झाली की १२डी फॉर्म या लोकांना पर्याय निवडण्यासाठी असतील, त्यांना घरपोच फॉर्म दिला जाईल. त्यांच्याकडून ऑप्शन देऊन जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल”, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, मतदान मोठा उत्सव आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही जेष्ठ नागरिकाना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येण्याची विनंती करणार आहोत. त्यामुळं त्यांना पाहून इतर लोक मतदानासाठी बाहेर पडतील, असं देशपांडे यांनी सांगितलं. तसंच, घरी बसून मतदान करण्याचा प्रयोग कसबा पोटनिवडणूकीत झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे घरी बसून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून मतदान करणं शक्य होणार आहे असं ते म्हणाले.