काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी आज मतदान; कोण मारणार बाजी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष्य असलेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. तब्बल २२ वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. 19 ऑक्टोबरला काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळेल.

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 9,000 हून अधिक प्रदेश काँग्रेस कमिटी (PCC) प्रतिनिधी गुप्त मतपत्रिकेद्वारे मतदान करतील. तर महाराष्ट्रातील 561 प्रदेश प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा एआयसीसीचे मुख्यालय आणि देशभरातील 65 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

सध्या भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी हे कर्नाटकातील संगनकल्लू येथून मतदान करतील. शशी थरूर तिरुअनंतपुरम येथील केरळ काँग्रेस मुख्यालयात मतदान करतील, तर खर्गे बेंगळुरू येथील कर्नाटक काँग्रेस कार्यालयात मतदान करतील. यानिवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचे पारडे जड वाटत आहे. गांधी घराण्यातील एकही सदस्य या निवडणुकीत उभा राहिला नाही त्यामुळे अनेक वर्षानंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळणार आहे.