Voter ID : मतदान कार्ड नसलं तरी करता येणार मतदान; ही ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. आपल्या महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठीच आपल्याकडे मतदान ओळखपत्र (Voter ID) तर असावेच लागते. परंतु जर तुमचं मतदान ओळखपत्र हरवलं असेल तरीही चिंता करू नका, कारण मतदान ओळखपत्राशिवाय असेही काही ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले जातात जे दाखवून तुम्ही मतदान करू शकता आणि मतदानाचा आपला हक्क बजावू शकता.

कोणकोणते पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरतात?

आधार कार्ड
पॅन कार्ड
भारतीय पासपोर्ट
फोटोसह बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक
मनरेगा जॉब कार्ड
कामगार मंत्रालयाने जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
चालक परवाना
स्मार्ट कार्ड
फोटोसह पेन्शन दस्तऐवज
केंद्र किंवा राज्य सरकारे किंवा सार्वजनिक उपक्रमांनी जारी केलेले फोटो असलेले सेवा ओळखपत्र
सामाजिक न्याय मंत्रालयाने जारी केलेले अक्षम आय कार्ड

लोकसभा निवडणूक पूर्णपणे पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. कोणताही खरा मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याकडे निवडणूक आयोगाचे पूर्ण लक्ष आहे. आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिपिक किंवा स्पेलिंग चुकांकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे. समजा, एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे.