क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी!! वानखेडे स्टेडियमवर या गोष्टी मिळणार फ्री मध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात 5 ऑक्टोबर पासून आयसीसी वर्ल्ड कप 2023 चा (ICC World Cup 2023) थरार सुरु झाला आहे. जगभरातील अनेक क्रिकेटप्रेमी क्रिकेटचा हा थरारक अनुभव घेताना दिसत आहेत. 2023 चा वर्ल्डकप कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनांच लागलेली आहे. भारतीय संघाने यंदा दिमाखदार कामगिरी करत आत्तापर्यतचे आपले सर्व सामने जिंकले आहेत, आता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेशी भारताचा महत्वाचा सामना होणार असुन या पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट असोसिएशने प्रेक्षकांसाठी मोठी घोषणा केली आहे.

संपूर्ण स्टेडियम भारत आणि श्रीलंका मॅचसाठी सज्ज :

2 नोव्हेंबर 2023 रोजी हा सामना  वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी तयारी जय्यत पद्धतीने करण्यात आली आहे. संपूर्ण स्टेडियम भारत आणि श्रीलंका मॅचसाठी सज्ज आहे. यातच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशने प्रेक्षकांसाठी मोठी घोषणा  केली आहे. या घोषनेनुसार, भारत  आणि श्रीलंका मॅच दरम्यान प्रेक्षकांना पॉपकॉर्न व कोल्ड्रिंक मोफत देण्यात येणार आहेत. याआधीच  BCCI ने आयसीसी वर्ल्ड कप  2023 दरम्यान होणाऱ्या सर्व क्रिकेट मॅच मध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना मोफत पाणी बॉटल देण्याची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशने प्रेक्षकांसाठी ही मोठी घोषणा  केली आहे.

MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांची मोठी घोषणा  :

MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांनी बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेतील सामन्यानंतर ही घोषणा केली असून त्यांनी सांगितले की,  ” विश्वचषकातील सामने पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व चाहत्यांना मी एक वेळचे पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स मोफत देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. चाहत्यांच्या तिकिटांवर शिक्का मारल्यानंतर प्रत्येक चाहत्याला मोफत पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स दिले जाईल. याचा सर्व खर्च मुंबई क्रिकेट असोसिएशन करेल. आम्ही याची सुरुवात भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यापासून करणार असून ही सेवा उपांत्य फेरीच्या सामन्यापर्यंत सुरू राहील. MCA च्या इतर सदस्यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे.”

सचिन तेंडुलकरचा २२ फूट उंच पूर्णाकृती ब्राँझच्या पुतळा उभारला जाणार :

तसेच भारत आणि श्रीलंका मॅच सुरु होण्यापूर्वी आणखी एक महत्वाचा कार्यक्रम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या माध्यमातून पार पडला जाणार आहे. वानखेडे स्टेडियमवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या २२ फूट उंच पूर्णाकृती ब्राँझच्या पुतळा उभारला  जाणार आहे. विजय मर्चंट सँट आणि सचिन तेंडुलकर स्टँडच्या मधोमध हा पुतळा उभारण्यात आला असून 1 नोव्हेंबर रोजी पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.