खळबळजनक ! आरोपी पतीने पोलिसांच्या देखत पत्नीच्या तोंडात टाकले विष, वर्धा येथील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आरोपी पतीने पोलिसांच्या समोरच पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करून तिच्या तोंडात विषारी औषध (kill his wife by poisoning her) टाकले आहे. काजल असे पीडित पत्नीचे नाव असून निलेश असे आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणी (kill his wife by poisoning her) आर्वी पोलिसांनी पत्नीच्या जबाबावरुन पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पती निलेशला अटक केली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पीडित पत्नी मुलाला घेण्यासाठी घरी गेली होती. हि धक्कादायक घटना आर्वी शहराच्या आसोले लेआऊट परिसरामध्ये घडली आहे. या पीडित महिलेवर आर्वी येथील सरकारी रुग्णालयात (kill his wife by poisoning her) उपचार सुरु आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, पतीने मारहाण केल्याने काजल ही पती निलेश विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. आरोपी पतीने मुलाला सोबत नेऊ न दिल्याने पोलिसांना ही बाब सांगून मुलाला सोबत देण्याची विनंती तिने पोलिसांकडे केली.

यानंतर दोन पोलीस कर्मचारी महिलेसोबत तिच्या घरी मुलाला आणण्यासाठी गेले. तिने मुलाला सोबत घेत काही कपडे घेत असतानाच संतापलेल्या पतीने पत्नीला पकडून मारहाण करायला सुरुवात केली.यानंतर तिला जबरदस्तीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न (kill his wife by poisoning her) केला. यानंतर काजलने जोरजोरात आरडाओरड केली असता घराबाहेर उभ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घरात धाव घेऊन आरोपी पती आणि मुलाला पोलीस ठाण्यात आणले. तसेच पीडित काजलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

हे पण वाचा :

Mutual Funds : ‘या’ तीन फंडांनी 7 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये !!!

FD Rates : SBI की पोस्ट ऑफिस यापैकी कोणत्या FD वर चांगला रिटर्न मिळेल ते पहा !!!

Silver Price : चांदीमध्ये खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का ???

Multibagger Stocks : घसरत्या बाजारातही ‘या’ 5 स्मॉलकॅप शेअर्सनी दिला 500 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

Multibagger Stock : अदानी ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गाठला सर्वकालीन उच्चांक !!!