‘त्या’ विधानासाठी वारीस पठाणांनी मागितली माफी पण..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये एका जाहीर सभेत बोलताना ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील’ असं वादग्रस्त विधान केलं होतं. वारिस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे तसेच समाजातील विविध स्तरांतून टीका करण्यात येत आहे. सदर वादग्रस्त विधानमुळ वारिस पठाण यांच्याविरुद्ध कर्नाटक आणि महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला आहे.आपण केलेलं वक्तव्य अंगलट आल्यानं आज वारिस पठाण यांनी माफी मागितली आहे.

”राजकीय षडयंत्रांमुळे माझे आणि माझ्या पक्षाला लक्ष्य करण्यासाठी व त्यांची बदनामी करण्यासाठी माझे वक्तव्य चुकीच्या अर्थानं पसरवलं गेलं. तथापि, मी माझे शब्द परत घेतो. जर माझ्या विधानामुळं कोणी दुखावले गेल असेल तर त्याबद्दल दिलगिरी मी व्यक्त करतो” अशा शब्दांत वारिस पठाण यांनी माध्यमासमोर माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयन्त केला आहे.

दरम्यान, एआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील वारीस पठाण यांच्यावर कारवाई केलेली आहे. वारीस पठाण यांना माध्यमांवर बोलण्यास पक्षाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे, पक्षाचे पुढचे आदेश येईपर्यंत वारिस पठाण सार्वजनिक रुपात कोणतंही वक्तव्य करू शकणार नाहीत. तर, दुसरीकडे औरंगाबादचे खासदार व एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी देखील वारीस पठाण यांच्या हिंदू-मुस्लिम वक्तव्यावर स्पष्टीकरण मागणार असल्याचं सांगितलेलं आहे.

 

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment