अपघातग्रस्त ट्रक कारवर झाला पलटी; कारमधील कुटुंब थोडक्यात बचावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाशीम : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील रस्ते अपघातात (accident) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशीच एक अपघाताची (accident) घटना नागपूर मुंबई एक्स्प्रेस हायवेवर घडली आहे. यामध्ये दोन ट्रकचा भीषण अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातानंतर अपघातग्रस्त ट्र्क थेट कारवर कोसळला. धक्कदायक म्हणजे या कारमधून एक कुटुंब प्रवास करत होते. हे कुटुंब थोडक्यात बचावले आहे. बोलतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच काहीसे या अपघातात (accident) घडले. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात ट्रकचालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

काय घडले नेमके?
नागपूर मुंबई द्रुतगती महामार्गावर कामरगाव येथील अंकुश धाबाजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात (accident) झाला. यामध्ये दोन ट्रकची एकमेकांना धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर (accident) ट्रक रस्त्यावरुन जात असलेल्या कारवरच पलटी झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

या कारमधील प्रवासी दैव बलवत्तर म्हणून अगदी थोडक्यात बचावले आहेत. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतुक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. या अपघाताची (accident) माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांना हटवण्यात आले आणि महामार्गावर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय