टीम इंडियाला मोठा धक्का! वनडे सिरीजपूर्वी ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर

Team India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाला झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकणार आहे. कौंटी क्रिकेटमध्ये खेळताना झालेल्या दुखापतीमुळे त्याला (Washington Sundar) या दौऱ्याला मुकावे लागणार आहे. भारत-झिम्बाब्वे मालिकेला 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 3 एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. गेल्या काही काळापासून सुंदर (Washington Sundar) क्रिकेटपासून दूर होता तो या मालिकेतुन टीम इंडियामध्ये पुनरागमन करणार होता. मात्र आता दुखापतीमुळे त्याला पुनरागमनासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. गेल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये झालेल्या रॉयल लंडन वन डे चषकादरम्यान सुंदरच्या खांद्याला दुखापत झाली होती. लँकेशायर काउंटी क्लबकडून खेळत असताना क्षेत्ररक्षण करताना त्याला ही दुखापत झाली.

फिटनेस समस्यांनी भरलेले वर्ष
वॉशिंग्टन सुंदरसाठी (Washington Sundar) हे वर्ष फिटनेस-संबंधित समस्यांनी भरलेले आहे. गतवर्षी इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया आणि कौंटी संघ यांच्यातील सराव सामन्यादरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली होती, त्यामुळे तो सुमारे 4-5 महिने टीमच्या बाहेर होता. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली आणि जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड झाली. यानंतर या दौऱ्यावर जाण्यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्याची हि संधी हुकली.

यानंतर तो (Washington Sundar) फेब्रुवारीमध्ये परतला आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळला, पण हाताच्या दुखापतीमुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतून बाहेर पडला. यानंतर सुंदरने आयपीएल 2022 मधून पुनरागमन केले मात्र या ठिकाणीसुद्धा दुखापतीने त्याचा पाठलाग सोडला नाही. यामध्ये बोटाला दुखापत झाल्यामुळे त्याला (Washington Sundar) काही सामन्यांना मुकावे लागले होते. आयपीएलनंतर त्याला काऊंटी क्रिकेटमध्ये पाठवण्यात आले, जिथे तो चांगली कामगिरी करत होता, पण आता त्याला पुन्हा दुखापत झाल्याने त्याचे टीम इंडियातील पुनरागमन लांबले आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर