Wasim Jaffer Birthday : देशांतर्गत क्रिकेटचा ‘किंग’ वसीम जाफर; रणजीमध्ये काढल्यात खोऱ्याने धावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Wasim Jaffer Birthday : भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरचा आज वाढदिवस आहे. वसीम जाफर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असला तरी त्याची खरी ओळख होते ती म्हणजे रणजी सामन्यात खोऱ्याने धावा काढणारा देशांतर्गत क्रिकेटचा ‘किंग’ अशी…. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या जाफरने आपल्या २५ वर्षाच्या रणजी कारकिर्दीत 19410 केल्या. यादरम्यान त्याने मुंबई आणि विदर्भ क्रिकेटचे प्रतिनिधित्व केलं. प्रथम श्रेणी क्रिकेटपटू म्हणून तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

रणजीमध्ये काढल्यात खोऱ्याने धावा – Wasim Jaffer Birthday

वसीम जाफरने वयाच्या 16 व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. आपलॆ तंत्रशुद्ध फलंदाजी आणि संयम या दोन महत्वाच्या गोष्टीवर जाफरने फोकस ठेवला आणि ५ दिवसांच्या रणजी सामन्यात फलंदाजी कशी करायची याचा आदर्श निर्माण केला. 18 वर्षे मुंबईकडून खेळल्यानंतर जाफरने 2015-16 मध्ये विदर्भाकडून खेळण्यास सुरुवात केली. फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए मध्ये खेळल्या गेलेल्या एकूण 342 सामन्यांमध्ये त्याने 23,457 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण ६७ शतके झळकावली. वसीम जाफर मुंबईसाठी 8 वेळा आणि विदर्भासाठी दोन वेळा रणजी करंडक विजेत्या संघाचा सदस्य होता. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई दोनदा चॅम्पियनही झाली.

देशांतर्गत क्रिकेट मधील दमदार कामगिरीच्या जोरावर वसीम जाफरला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले. 2000 साली जाफरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 31 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 1944 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये त्याने 5 शतके आणि 11 अर्धशतके झळकावली. तसेच त्याची सर्वोच्च धावसंख्या 212 होती. भारताच्या संघात वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर तसेच मुरली विजय यांसारखे दिग्गज सलामीवीर असल्याने वसीम जाफरला म्हणावी तशी संधी मिळाली नाही. मात्र देशांतर्गत क्रिकेट मध्ये मात्र वसीम जाफरचा खराखुरा बादशाह ठरला हे मात्र कोणीही नाकारू शकत नाही. अशा या स्टार फलंदाजाला हॅलो महाराष्ट्रकडून वाढदिवसाच्या (Wasim Jaffer Birthday) मनपूर्वक शुभेच्छा…..