फक्त 49 रुपयांमध्ये पहा IPLचे ऑनलाईन सामने; JIO च्या या प्लॅनमध्ये मिळतोय भरपूर डेटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजपासून म्हणजेच 22 मार्चपासून IPL चे सामने सुरू होत आहेत. परंतु आयपीएलचे हे सामने पाहण्यासाठी आपल्या कामामुळे कित्येकजण टीव्ही पुढे बसू शकणार नाही. त्यामुळे त्यांना आयपीएलचे हे सामने मोबाईल वरच पहावे लागतील. क्रिकेटप्रेमींची हीच गरज लक्षात घेऊन जिओनी एक भन्नाट प्लान ऑफर केला आहे. या प्लानमुळे तुम्ही फक्त 49 रुपयांमध्ये IPL पाहू शकता. हा प्लान तुम्हाला 25GB डेटा जिओ कंपनीकडून देण्यात येईल. जो वापरून तुम्ही आयपीएलची मजा घेऊ शकता.

भारतामध्ये क्रिकेट प्रेमींचीसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. यात आता आजपासून आयपीएल सुरू होत असल्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये जास्त उत्सुकता दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरच जिओनी आपला नवीन 49 रुपयांच्या किंमतीचा प्लान लाँच केला आहे. या प्लानअंतर्गत तुम्ही कोणतीही डेटा संपण्याची चिंता नका आयपीएल पाहू शकता. परंतु या प्लॅनची वैधता फक्त 1 दिवसाची असेल. ज्यामध्ये तुम्हाला 2GB किंवा 3GB डेटा नाही तर तब्बल 25GB डेटा मिळेल. या डेटा सह तुम्ही कोणत्याही JioCinema ॲपवर IPL 2024 सामना पाहू शकता.

खास म्हणजे, तुम्हाला या पॅकची वैधता कमी वाटत असेल तर तुम्ही डेटा पॅकचा रिचार्ज करू शकता. दीर्घकालीन असणाऱ्या डेटा प्लानची किंमत 301 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला एक महिन्याचे वैधता मिळेल. या प्लॅनमार्फत तुम्हाला महिन्यासाठी 50 जीबी डेटा मिळेल. याव्यतिरिक्त तुम्ही 444 रूपयांचा ही रिचार्ज करू शकता. यामध्ये तुम्हाला 100GB डेटाचा मिळेल. ज्याची वैधता एकूण 60 दिवसांपर्यंत असेल. जिओचे हे सर्व प्लॅन आयपीएलसाठी लॉन्च करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही याचा आयपीएल काळात फायदा घेऊ शकता.