साताऱ्याच्या कास तलावाचा 3 दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वातावरणात उष्माघाताचे प्रमाण वाढले असल्यामुळे नदी, नाले आणि तलाव, ओढ्यांतील पाणी आटू लागले आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. सातारा शहरास कास तलावाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, कास तलावाचा पाणी पुरवठा 3 दिवस बंद ठेवला जाणार आहे.

सातारा नगरपालिकेच्या वतीने सातारकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवार दि. 17 एप्रिल रोजी कास धरणातील येणाऱ्या पाईपलाईनचे लिकेज काढणे तसेच मुख्य साठवण टाक्या साफ करणे आदी कामे युद्धपातीळवर पालिकेने हाती घेतली आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून सातारा पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन सातारा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

सातारा पालिकेने हाती घेतलेल्या विविध कामांमुळे सोमवारी कास तलावाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणारा भाग म्हणजेच कांबळी वस्ती, बालाजी अपार्टमेंट, समर्थ मंदिर परिसर तसेच कात्रेवाडा टाकी माध्यमातून होणारा संध्याकाळचा पाणीपुरवठा हा सोमवारी, दि. 17 एप्रिल रोजीसायंकाळी सत्रात होणार नाही.

मंगळवार, दि.18 एप्रिल व बुधवारी, दि.19 एप्रिल रोजी कास माध्यमातील संपूर्ण पाणीपुरवठा कमी जास्त प्रमाणात अथवा न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोटेश्वर टाकी, भैरोबा टाकी, व्यकंटपूरा टाकी, कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी या टाक्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरनी वापर करून सातारा पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन सातारा पालिकेच्या पाणी पूरवठा विभागाने केले आहे.