हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) वायनाडची (Wayanad) जागा सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याठिकाणी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता वायनाडच्या जागेवर भाजप कोणाला उमेदवारी देणार याची सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यामध्ये स्मृती इराणी (Smruti Irani) यांचं नाव आघाडीवर दिसत आहे. सोशल मीडियावर तशा चर्चा सुरु आहेत. 1999 मध्ये अशाच पद्धतीने जेव्हा सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांनी सोनियांविरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे भाजप आता 1999 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य आहे.
२०१९ मध्ये अमेठी मधून राहुल गांधींना पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी याना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या केएल शर्मा यांच्याकडून अमेठीतच पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत भाजप त्यांना वायनाड जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.असं झाल्यास 1999 मध्ये ज्याप्रमाणे सोनिया गांधी विरुद्व सुषमा स्वराज अशी लढत झाली होती त्याचप्रमाणे आता प्रियांका गांधी विरुद्ध स्मृती इराणी असा रंगतदार सामना पाहायला मिळेल.
1999 मध्ये नेमकं काय घडलं होते?
सोनिया गांधीं यांनी कर्नाटकातील बेल्लारीतून पहिली पोटनिवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी भाजपने आश्चर्यकारकपणे सुषमा स्वराज यांना त्यांच्या विरोधात उमेदवारी दिली. सुषमा स्वराज यांनीही सोनिया गांधीला तगडी फाईट दिली. त्या पोटनिवडणुकीत सोनिया गांधींना 414000 मते मिळाली. तर सुषमा स्वराज यांना साडेतीन लाखांहून अधिक मते मिळाली होती. सोनिया गांधींना ही निवडणूक जवळपास 56000 मतांनी जिंकता आली.