विधानपरिषद निवडणुकीत कोणाला मतदान करणार? बच्चू कडू यांनी सगळंच सांगून टाकलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election 2024) आज पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे कोणाचा बळी जाणार? कोण विजयी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे. मतांचे एकूण गणित बघितल्यास मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीचे मतदान हे गुप्त पद्धतीने होणार असल्याने फोडाफोडीचे राजकारण बघायला मिळू शकते. याच दरम्यान, मतदान करण्यापूर्वी प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मीडियाशी संवाद साधत आपण कोणाला मतदान करणार तेच सांगून टाकलं आहे.

बच्चू कडून म्हणाले, आम्ही दोन वर्ष शिंदे साहेबांसोबत आहोत. आताही त्यांच्यासोबत आहे. एकनाथ शिंदेनी मतदारसंघात भरपूर निधी दिला. त्याची जाण ठेऊन आम्ही मतदान करणार आहे. मी माझी गॅरेटी घेतो. मी स्वत: आणि राजकुमार पटेल आम्ही दोघे शिंदे साहेबांसोबत जाऊन मतदान करणार आहोत. भावना गवळी आणि कृपाल तुमाने या दोघांना आम्ही मतदान करणार. दोघे विदर्भाचेच आहेत असं बच्चू कडू यांनी सांगितलं. एकनाथ शिंदेचे दोन्ही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील, आमचं एकही मत फुटणार नाही. मात्र इतरांचे मला सांगता येत नाही” असेही बच्चू कडू यांनी म्हंटल.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. तर शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने याना संधी देण्यात आली आहे तर अजित दादा गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीबाबत सांगायचं झाल्यास, काँग्रेसकडून प्रज्ञा राजीव सातव, शेकापचे जयंत पाटील आणि ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना संधी देण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 23 मतांचा कोटा असेल. त्यामुळे महाविकास आघाडीला आणखी ४ ते ५ जागांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.