हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा गावरान आंब्याला (gavran mango)मोहोर येण्यासाठी अडचणी आल्या आहेत. सतत बदलत असलेल्या हवामानामुळे, विशेषतः अवकाळी पाऊस आणि धुक्यामुळे आंब्याचा मोहोर गळून गेला किंवा जळाला आहे . या समस्येमुळे गावरान आंब्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे, आणि आंब्याची चवही यंदा अपेक्षेपेक्षा कमी होणार आहे. त्यामुळे अनेकजण नाराज झाले आहेत. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
आंब्याचा मोहर गळून गेला –
डिसेंबर महिन्यात ढगाळ हवामान व धुके पडल्याने आंब्याचा मोहर गळून गेला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा थंडी उशिरा सुरू झाली, आणि वातावरण ढगाळ राहिल्यामुळे मोहोर फुटायला उशीर झाला. यामुळे गावरान आंब्याच्या फूटमध्ये घट होईल, असे अनुमान व्यक्त केले जात आहे. या हवामानाच्या बदलामुळे आंब्याच्या झाडांवर भुरी रोग आणि तुडतुडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांना औषधफवारणी करण्याचे आवाहन केले आहे. योग्य वेळी फवारणी केल्यास, मोहर आणि फळांचे संरक्षण होऊ शकते.
थेट परिणाम बाजारभावावर –
गावरान आंब्याच्या उत्पादनात घट होण्याचा थेट परिणाम बाजारभावावर होऊ शकतो. आंब्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात आंब्यांची उपलब्धता कमी होऊ शकते, आणि त्याचा परिणाम आंब्याच्या किमतींवर होईल. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे की, यंदा अपेक्षित प्रमाणात उत्पादन मिळणार नाही, आणि त्यामुळे आमरसाच्या हंगामात घट होईल. सतत बदलणारे हवामान आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिळवणुकीत आणखी भर पडली आहे, आणि यंदा आंब्याचा आस्वाद घेणे खवय्यांसाठी कठीण होणार आहे.