पुणे प्रतिनिधी । संपूर्ण देशभरात उशिरा पर्यंत राहिलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. तसेच अवकाळी पावसामुळे देखील मोठे थैमान घातले. याचा मोठा परिणाम राज्यामध्ये झाला. सध्या पाऊस संपून थंडीचे आगमन होत आहे. देशभरातील नागरिकांना कडाक्याच्या थंडीचे वेध लागले आहे. मात्र बळीराजाच्या चिंतेत भर टाकणारी शक्यता हवामान विभागाने सध्या वर्तवली आहे.
अरबी समुद्रात दक्षिण पश्चिमेस तयार झालेल्या प्रभावी अशा कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर पुढील ७२ तासात चक्रीवादळात होण्याची शक्यता असून ते सोमालियाचे दिशेने सरकू शकते. या बदलामुळे पुढील दोन दिवसात रत्नागिरी, सिधुदुर्ग, औरंगाबाद, परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यात गडगडाटसह किरकोळ पाऊस पडू शकतो असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील किमान तापमानात घट होत असली तरी अजून कमाल तापमानाचे आकडे चढेचआहेत. त्याचवेळी अरबी समुद्रात तयार झालेल्या प्रभावी अशा कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शकयता आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.