Weather Update : पुढील 2 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; बळीराजाला दिलासा मिळणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण ऑगस्ट महिना (Weather Update) पावसाविना कोरडा गेल्यानंतर आत्ता सप्टेंबर महिन्यात तरी पाऊस पडेल का नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु कालपासून महाराष्ट्रात पाऊस (Rain In Maharashtra) जोर धरताना दिसत आहे. काल महाराष्ट्राच्या काही भागात चांगला पाऊस पडला असून शेतकरी सुखावला आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात पुढचे दोन दिवस म्हणजेच 8 आणि 9 सप्टेंबरला सुद्धा राज्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. असं झालयास बळीराजा साठी ही मोठी दिलासादायक बाब ठरेल.

महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन :

आज मुंबई आणि पुण्यात पहाटेपासून तर विदर्भात आणि मराठवाड्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने कोकण, गोवा आणि विदर्भात आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठाणे परिसरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातही सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, कालपासून अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळच्या छायेत :

मराठवाड्यातील परभणी , बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना , औरंगाबाद ( संभाजीनगर ) मध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. जायकवाडी सारखे महत्वाचे धरण कोरडेच आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

उत्तर महाराष्ट्र मधील नाशिक, अहमदनगर, जिल्ह्यात शेतकरी पावसाची वाट बघत आहे. या भागात असलेली बागायती शेती त्यामुळे अडचणीत आली आहे. महाराष्ट्रातील अन्य जिल्हे देखील चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पुढील दोन दिवस पाऊसाची शक्यता वर्तवल्या मुळे शेतकऱ्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.