हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – उत्तर भारतातील हिमवर्षावामुळे तिथे थंडी अनुभवता येत असली तरी, महाराष्ट्रात उकाडा वाढला आहे. राज्यात कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाड्याची तीव्रता वाढली आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हलक्या सरी बरसत आहेत, तर ढगाळ हवामानामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे. हवामान विभागाने वर्तवले आहे की, आजपासून म्हणजेच 17 जानेवारी 2025 तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तर चला या हवामान विभागाच्या अंदाजाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राज्यात एकूण तापमान वाढण्याची शक्यता –
राज्यात एकूण किमान (Weather Update) तापमान 3 ते 6 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. आग्नेय अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून , तसेच उत्तर भारतात पश्चिमेकडून जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. या वाऱ्यांमुळे थोडासा प्रभाव महाराष्ट्रावर दिसत आहे, ज्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे.
उकाड्यात वाढ (Weather Update) –
16 जानेवारीला राजस्थानच्या नागौर येथे देशातील सपाट भूभागावर नीचांकी 3.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे . याच दरम्यान महाराष्ट्रात सकाळी उशिरापर्यंत धुके दिसत आहे. ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली असून उकाड्यात वाढ झाली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात हलक्या सरी पडल्या आहेत, आणि उर्वरित राज्यात उकाडा वाढलेला दिसून येत आहे.
हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता –
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 11.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पुढील काही दिवस हलक्या सरी (पाऊस) पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वाऱ्यांची स्थिती बदलली आहे, आणि तापमानात चढ-उतार (Weather Update) होत आहेत. पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तर भारतात थंडी अनुभवली जात असली तरी महाराष्ट्रात सर्दी, पडसे आणि तापाची लक्षणे जाणवत आहेत, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
हे पण वाचा : Reliance चा नफा 18540 कोटींवर; शेअर्समध्ये मोठी वाढ