Weather Update : संपूर्ण देशभरात हवामान बदलाचा प्रभाव दिसून येत आहे. काही भागांमध्ये अचानक पाऊस आणि वादळी वारे गारवा निर्माण करत असताना, इतर भागांत उष्णतेची तीव्रता वाढत आहे.भारतीय हवामान विभागानुसार, उत्तर भारतात तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची (Weather Update) शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तर महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर राज्यातही गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ होताना दिसून येते काही ठिकाणी पार हा 42° पर्यंत पोहोचलाय विदर्भात पुढचे दोन दिवस उन्हाचा तडाखा जाणवणार असल्याचा हवामान विभागाकडून (Weather Update) सांगण्यात आला आहे याबरोबरच राज्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे डबल संकट
पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा तडाखा एकाचवेळी
शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा
मच्छीमारांना खोल समुद्रात जाण्यास मनाई
दिल्लीसह अनेक राज्यांत उष्णतेची लाट (Weather Update)
दिल्लीतील सध्याचे तापमान३१ अंश सेल्सिअस असून, मार्च अखेरीस ते ४० अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
सोमवारी कमाल तापमान – ३२ अंश
किमान तापमान – १७ अंश
हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) – ८५ (स्वच्छ हवा)
‘या’ राज्यांत पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज (Weather Update)
हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार – जोरदार वारे आणि हलक्या पावसाची शक्यता
ईशान्य भारत (आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम) – पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस
दार्जिलिंग, सिक्कीम, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात – काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता
उष्णतेच्या लाटेचा तडाखा कोणत्या भागांना?
ओडिशा, झारखंड, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी (Weather Update)
भरपूर पाणी प्या आणि हलके, सैलसर कपडे घाला
गरज नसल्यास उन्हात बाहेर पडणे टाळा
हवामान खात्याच्या ताज्या अपडेट्सवर लक्ष ठेवा