Weather Update | राज्यातील ‘या’ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कोसळणार पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Weather Update सध्या महाराष्ट्रातील तापमान वाढले असले, तरी काही ठिकाणी मात्र अवकाळी पाऊस पडल्याचे दिसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता किनारपट्टीवरील शहरे वगळतात. राज्यातील बहुतांश ठिकाणी वादळ आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या उष्णतेची लाट आलेली दिसत आहे. परंतु अशातच अनेक ठिकाणी पाऊस देखील पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील सात दिवस राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार (Weather Update) आहे. हवामान खात्याने दिलेले माहितीनुसार आता किनारपट्टीवरील शहरे वगळता राज्यातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळीवाऱ्यासह होणारच आहे.

काही भागांमध्ये पावसाची शक्यता | Weather Update

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता 21 एप्रिल आणि 22 एप्रिल रोजी कोकण गोव्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे पाच ते सात दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक ठिकाणी वादळ वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही विदर्भात देखील आता तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे.

त्यामुळे येत्या काळात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, बीड, नांदेड, परभणी, नगर, धाराशिव त्याचप्रमाणे हिंगोली येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत कसं राहणार तापमान?

सध्या मुंबई सह किनारपट्टीच्या भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे. त्यामुळे वाढत्या उकड्यापासून नागरिकांना देखील दिलासा मिळालेला आहे. किनारपट्टीवरील सरासरी तापमान हे 30° सेल्सिअसवर गेलेले आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र सरासरी तापमान हे 39°आहे तर विदर्भात ते 42° सेल्सिअस एवढे आहे. परंतु मुंबईच्या काही ठिकाणी देखील उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने लावलेला आहे.