Weather updates: राज्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येणार; तर या भागात कोसळणार पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather updates| गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परंतु आता पुढच्या 2 दिवस राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये तुरळक पाऊस बरसेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना या भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे.

सध्याच्या घडीला पाहिला गेलो तर, मुंबईत नव्हे तर महाराष्ट्राच्या इतर भागातही गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे तर मुंबईची दशा फारच विकट झाली आहे. मंगळवारी मुंबईमध्ये 2 मोठे बॅनर कोसळल्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या सर्व लोकांसाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. अशा स्थितीत हवामान खात्याने पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहील, अशी माहिती दिली आहे. (Weather updates)

हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या 19 मेपर्यंत राज्यात मान्सून दाखल होऊ शकतो. त्यानंतर 31 मेच्या आसपास नैऋत्य मोसमी वारे केरळात दाखल होतील. त्यापुढे 7 ते 10 जूनच्या आसपास महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल. परंतु महाराष्ट्रात मान्सून येईपर्यंत लोकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी बसायला लागल्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.

दरम्यान यावर्षीचा एप्रिल महिना सर्वात उष्ण ठरला आहे.(Weather updates) जागतिक स्तरावर एल-निनो फॅक्टरमुळे एप्रिल महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. यामुळेच नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये एप्रिल महिना सर्वाधिक उष्ण राहिला. यासह युरोपमध्ये सर्वात उष्ण असलेल्या महिन्यांमध्ये एप्रिल महिन्यांचे दुसऱ्या क्रमांकावर नोंद करण्यात आली.