Weekend Destinations : पाच दिवस भरपूर काम करून तुमचा मेंदू थकला असेल आणि विकेंड ला आपल्या कुटुंबासोबत तुम्हाला एक रेफ्रेशमेंट देणारा क्वालिटी टाइम घालवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या अशा काही ठिकाणांची माहिती सांगणार आहोत जिथे गेल्यावर (Weekend Destinations) तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मस्त वेळ घालवू शकाल. चला तर मग जाणून घेऊया या ठिकांणाबद्दल…
महाबळेश्वर
आजच्या या आपल्या ठिकाणांच्या लिस्ट मध्ये हे ठिकाण पहिल्या क्रमांकावर येईल. उन्हाळा असो की हिवाळा या ठिकाणचे निसर्ग सौन्दर्य म्हणजे खासच. पावसाळ्यात (Weekend Destinations) तर हे ठिकाण धबधब्यांनी फुलून जाते त्यामुळे धर्तीवर जणू स्वर्गच अवतरल्याचा भास होतो. विकेंड ला भेट देण्यासाठी हे उत्तम ठिकाण ठरेल यात शंका नाही.
लवासा
पुण्यापासून जवळपास ६० किमी अंतरावर असलेले हे ठिकाण आहे. तुम्हाला विकेंडला परदेशात फिरून यायचा फील घ्यायचा असेल तर लवासा उत्तम ठिकाण आहे. येथील माहोल हा इटालीशी मिळताजुळता आहे. पावसाळ्यात (Weekend Destinations) हे ठिकाण अधिक सुंदर होते. विकेंड रिफ्रेशमेंट साठी हे ठिकाण योग्य ठरेल.
रत्नागिरी (Weekend Destinations)
तुम्हाला विकेंडला समुद्रकिनारी फिरायला जायचे असेल तर हे ठिकाण लय भारी आहे असे म्हणावे लागेल. सुंदर स्वच्छ निळाशार समुद्र म्हणजे परफेक्ट डेस्टिनेशन यात शंका नाही. उन्हाळ्यामध्ये रत्नागिरी हापूस, काजू,रानमेवा चाखायला मिळेल. शिवाय गणपतीपुळे आणि रत्नदुर्ग किल्ला हे अत्यंत (Weekend Destinations) पाहण्यासारखी येथे ठिकाणे आहेत.
लोणावळा
थंड हवेचे ठिकाण म्हणून लोणावळा प्रसिद्ध आहे. पुणे आणि मुंबईच्या (Weekend Destinations) प्रवाशांना हे खूप सोयीस्कर असे ठिकाण आहे. लोणावळा समुद्रसपाटीपासून ६२४ मीटर उंचीवर वसलेले आहे. येथेही वर्षातील बहुतांश महिन्यांत हवामान आल्हाददायक असते. याशिवाय येथे तुम्ही ट्रेकिंग, हायकिंग चा आनंद घेऊ शकता.
अलीबाग
विकेंड साठी मुंबई पुण्यापासून जवळ असलेलं आणखी एक (Weekend Destinations) डेस्टिनेशन म्हणजे अलिबाग. अलिबाग हे सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते. त्याला मिनी गोवा असेही म्हणतात. अलिबागमध्ये आल्यावर तुम्ही कयाकिंग, जेट स्की, स्कूबा डायव्हिंग अशा अनेक उपक्रमांचा आनंद घेऊ शकता.