हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Facts) संपूर्ण जगभरात अनेक देश आहेत ज्यांची संस्कृती आणि तिथलं राहणीमान त्या त्या भागानुसार वेगवेगळं आहे. प्रत्येक देशाचं प्रत्येक भागाचं एक वेगळं कल्चर असतं. जे वर्षानुवर्ष लोक जपत आले आहेत. आजही आपण अशाच एका वेगळ्या आणि अनपेक्षित संस्कृतीबाबत माहिती घेणार आहोत. आजपर्यंत तुम्ही अनेक विचित्र आणि आश्चर्य वाटेल अशा ठिकाणांची माहिती घेतली असेल.
मात्र, आज आपण ज्या ठिकाणाबद्दल किंवा शहराबद्दल जाणून घेणार आहोत त्याबद्दल तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. (Weird Facts) आपण न्यूडेस्ट सिटीविषयी बोलत आहोत. या शहराला ‘न्यूडेस्ट सिटी’ म्हणतात कारण, इथे कपडे न घालण्यावर आक्षेप घेतला जात नाही. उलट इथली लोक न्यूड राहणे पसंत करतात. संपूर्ण जगभरातील हे एकमेव असे शहर आहे जे न्यूड टुरिझमसाठी ओळखले जाते. चला तर या अनोख्या शहराविषयी अधिक माहिती घेऊया.
कुठे आहे ‘हे’ शहर? आणि त्याचं नाव काय?
आपण ज्या शहराविषयी आणि त्याच्या कल्चर विषयी माहिती घेत आहोत त्याच नाव आहे Cap D’Adge. हे एक फ्रेंच शहर आहे. जे मेडिटेरियन कोस्टजवळ आहे. हे शहर आपल्या अनोख्या न्यूड लाइफस्टाइलसाठी (Weird Facts) ओळखले जाते. संपूर्ण जगभरातील हे एकमेव ठिकाण आहे जिथे कपडे न घालण्यावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला जात नाही. त्यामुळे हे शहर इतरांपेक्षा फार वेगळं आहे. या शहरात अनेक कपल्स फ्रिडम एन्जॉय करण्यासाठी येतात. त्यामुळे हे शहर फेमस हनिमून डेस्टिनेशनपैकी एक म्हणून ओळखले जाते.
कपड्यांशिवाय फिरण्याची सूट (Weird Facts)
Cap D’Adge हे एक असं फ्रेंच शहर आहे जिथे कपड्यांशिवाय फिरण्याचं विशेष स्वातंत्र्य दिलं जातं. कुणीतरी कपडे घातलेले नाही म्हणून इथे वाद होत नाहीत वा आक्षेप घेतला जात नाही. तसेच येथील समुद्रकिनारा फारच सुंदर आणि लोभसवाणा आहे. तुम्हाला कदाचित जाणून आश्चर्य वाटेल पण या शहरातील बीचेसवर न्यूड फिरणारी लोक अगदी रेस्टॉरंट आणि सुपर मार्केटमध्ये देखील कपड्यांशिवाय फिरू शकतात. (Weird Facts) इतकंच नाही तर एखादे शॉप असो किंवा मग सलून नाहीतर जिम कुठेही जाण्यासाठी इथे कपडे घालण्याची जबरदस्ती केली जात नाही. त्यामुळे या शहराला खास करून न्यूड टुरिझमसाठी ओळखले जाते.
दरवर्षी 50 हजाराहून अधिक पर्यटकांची गर्दी
Cap D’Adge या शहरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. इथे येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारे कपडे घालण्याची सक्ती केली जात नाही. त्यामुळे खास करून फ्रांस, जर्मनी, बेल्जियम, अमेरिका, इटली, डेन्मार्क येथील अनेक लोक या शहरात मोठ्या संख्येने येताना दिसतात. (Weird Facts) सर्वसाधारणपणे दरवर्षी या ठिकाणी ५० हजाराहून अधिक पर्यटक केवळ न्यूड टुरिझमचा लाभ घेण्यासाठी येतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.