हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Traditions) आपला देश विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात, जिल्ह्यात, गावांत विविध संस्कृती, रूढी आणि परंपरांचे जतन करण्यात आले आहे. देशभरात विविध ठिकाणी विविध जाती जमातीचे, भाषेचे आणि समाजाचे लोक एकत्र वास्तव्य करत आहेत, जिथे विविध परंपरांचे हजारो वर्षांपासून जतन केल्याचे दिसून येते. आज आपण अशाच एका परंपरेविषयी जाणून घेणार आहोत. जी गेल्या अनेक शतकांपासून पाळली जात आहे. मात्र याविषयी जाणून घेतल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते. कारण या परंपरेनुसार मुलं त्यांच्या आजारी आणि वृद्ध आई वडिलांची हत्या करतात. होय. या विचित्र परंपरेविषयी सविस्तर जाणून घेऊया.
कुठे पाळली जाते ही विचित्र परंपरा? (Weird Traditions)
तामिळनाडूच्या दक्षिण भागांमध्ये थलैक्कूथथल नावाची ही अत्यंत विचित्र परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या पाळली जात आहे. या ठिकाणी परंपरेच्या नावाखाली मुलं आपल्या वृद्ध तसेच आजारी आई वडिलांना जीवानिशी मारतात. या प्रथेला इंग्रजीमध्ये ‘सेनिसाइड’ म्हणजेच वृद्धांची हत्या करणे असे म्हटले जाते. ही अत्यंत विचित्र परंपरा असून यामध्ये गरीबी आणि परंपरेचे विक्षिप्त मिश्रण दिसून येते. या परंपरेनुसार, जे वृद्ध लोक मृत्यूच्या मार्गावर आहेत किंवा कोमात आहेत त्या थेट जिवंत मारून यमसदनी धाडले जाते.
नक्की काय आहे ही परंपरा?
या विचित्र परंपरेनुसार एखादी वृद्ध व्यक्ती अखेरचा श्वास घेत असेल तर त्या व्यक्तीला मारण्याआधी तिला तेलाने आंघोळ घातली जाते. नंतर नारळाचे पाणी प्यायला दिले जाते. (Weird Traditions) त्यानंतर तुळशीचा रस आणि दूध दिले जाते. हे पेय त्यांच्याकडे मृत्यूपूर्वीचे पेय मानले जाते. हे पेय प्यायल्यानंतर त्या पीडित वृद्ध व्यक्तीच्या शरीराचे तापमान झपाट्याने कमी होतं जाते आणि त्यांना सर्दी होते वा थेट हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू होतो.
कसे मारतात?
या परंपरेत वृद्ध व्यक्तीचा जीव घेण्यासाठी तिला मुरुक्कू नावाची खारट जिलेबी खायला दिली जाते. ही जिलेबी चवीला कडू असते. ती खाताना घशात अडकते आणि यामुळे त्या वृद्धाचा मृत्यू होऊ शकतो. (Weird Traditions) एवढंच काय तर काही ज्येष्ठांना थंड पाण्याने आंघोळ घातली जाते. इथे वृद्धांना मारण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून त्यांचे पोट खराब केले जाते. यासाठी त्यांनी माती मिसळलेले दूषित पाणी पाजले जाते. ज्यामुळे त्यांचा मृत्यू होतो.
परंपरेमागील कारण
काही संशोधकांनी या परंपरेमागील मूळ कारण शोधले असता त्यांच्या निदर्शनास आले की, ही परंपरा पूर्वीच्या काळापेक्षात आता मोठ्या प्रमाणात पाळली जातेय. या प्रथेनुसार मृत्यूसाठी केवळ अशा वृद्ध लोकांची निवड केली जाते जे अंथरुणात पडलेले आहेत आणि त्यांचं मरण निश्चित आहे. पूर्वी वृद्धांची काळजी घेण्यासाठी लोक घरी असायचे. (Weird Traditions) ज्यामुळे कामधंदा होत नसे आणि गरीबमुळे अनेक कुटुंब वृद्धांचीदेखील नीट काळजी घेऊ शकत नव्हते. पुरेसे पैसे नसल्यामुळे ही प्रथा सुरु झाली. पण आजच्या काळात मात्र परिस्थिती असो नसो या परंपरेचा दुरुपयोग केला जातोय. त्यामुळे आता या परंपरेला आळा बसणे गरजेचे आहे.