शाहू विचार जागर यात्रेचे कराड येथे उत्साहात स्वागत

कराड | कोल्हापुर ते मुंबई दरम्यान निघालेल्या शाहू विचार जागर यात्रेचे स्वागत कराड (कोल्हापूर नाका) येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. कराड तालुक्यातील कापील येथील कल्पवृक्ष उद्योग समुहाचे अध्यक्ष भाऊसाहेब ढेबे व पाचवडवस्ती पोलीस पाटील सौ. वैशाली भाऊसाहेब ढेबे- पाटील या दांपत्याच्या वतीने या रथ यात्रा स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शाहू विचार जागर यात्रा समितीचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, उपाध्यक्ष बबनराव रानगे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचे कराड नगरीत स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कॉंग्रेस ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, कराड शेती बाजार समितीचे उपसभापती अशोक पाटील- पोतलेकर, माजी नगरसेवक सौरभ पाटील, पोपटराव सालुंखे, प्रवीण काकडे, विलास पोळ, महेंद्र भोसले, सौ. वनिता देवकर, वेदम अकॅडमीच्या मॅनेजिंग हेड सौ. सविता मोहिते, सौ. अश्विनी थोरात, सौ. प्रीती सुपेकर आदिंची उपस्थिती होती.

छत्रपती शाहू महाराज यांची विचारधारा जनसामान्यापर्यंत पोहचावी. यासाठी काढलेल्या ही शाहू विचार जागर यात्रा गुरुवार दि. 5 मे रोजी मुंबई येथे पोहचणार आहे. तेथे मान्यवरांच्या उपस्थितीत यात्रेची सांगता होणार आहे.