हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्यावर्षीच्या ओडिसा ट्रेन अपघातासारखाचा आज पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात (West Bengal Train Accident) झाला आहे. एनजेपीहून सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या कांचनगंगा एक्सप्रेसला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत रेल्वेचे डब्बे अक्षरशा उडून बाजूला फेकले गेले. आत्तापर्यंत या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रंगपाणी ते निजाबारी दरम्यान हा अपघात झाला. कांचनजंगा एक्सप्रेसन्यू जलपाईगुडीहून किशनगंज मार्गे सियालदहला जात होती. हि पॅसेंजर ट्रेन निजबारीसमोर उभी असताना पाठीमागून येणाऱ्या मालगाडीने भरधाव वेगात या एक्सप्रेसला धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती कि यामध्ये कांचनजंगा एक्सप्रेसच्या तीन बोगींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताच्या (West Bengal Train Accident) घटनेची मिळताच पोलीस, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
#WATCH | Goods train rams into Kanchenjunga Express train in Darjeeling district in West Bengal, several feared injured
— ANI (@ANI) June 17, 2024
Details awaited. pic.twitter.com/8rPyHxccN0
ममता दीदींकडून दुःख व्यक्त : West Bengal Train Accident
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातानंतर ट्विट करत दुःख व्यक्त केलं. दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीडेवा भागात झालेल्या एका भीषण रेल्वे अपघाताची माहिती कळताच धक्का बसला आहे. डिटेलस अजून समोर आले नसेल तरी कांचनजंगा एक्स्प्रेसची मालगाडीशी टक्कर झाल्याचे वृत्त आहे. बचाव आणि वैद्यकीय मदतीसाठी डीएम, एसपी, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. युद्धपातळीवर कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.