औरंगाबाद । राज्यभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक जीव जात आहेत. तर दुसरीकडे संचार बंदीचे आदेश धुडकावून शिवसेना आमदार तथा राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी पैठण तालुक्यातील त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, ग्रामस्थांची गर्दी जमवत विविध विकास कामांचे उद्घाटन केले होते.
या संदर्भात विविध प्रसार माध्यमांमध्ये छायाचित्रासह प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली, कोरोना काळात उद्घाटने, सभा,धार्मिक कार्यक्रम अशा गर्दी होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्याचे आदेश न्यायमूर्ती आर.व्ही.घुगे आणि न्यायमूर्ती बी.यु.देबडवार यांच्या पिठाणे बुधवारी दिले.
शासनाच्या मार्गदर्शक नियमांचा भंग करणाऱ्या या घटनेबाबत काय कारवाई केली अशी विचारणाही खंडपीठाने केली. याबाबत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे, यावेळी सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले.