विचार तर कराल । जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पंतप्रधानांनी सांगितलेल्या थाळी,टाळ्या वाजवणे आणि दिवा लावणे असेन त्याच्या या आव्हानाला भारतीय जनतेने मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. एकूणच त्या मागचा हेतू, उद्देश कितपत सफल झाला आणि कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आपण किती सक्षम व सज्ज झालो हे ही तपासणे गरजेचे आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण हा 30 जानेवारी ला सापडला ते आजतागायत आपण 5 हजार च्या वर रूग्ण सापडले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले असून आर्थिक राजधानी असलेली मुंबई मध्ये कोरोनाग्रस्थ सर्वाधिक रुग्ण संख्या आहे .यावर उपाययोजना म्हणून महाराष्ट्र पाठोपाठ देशभर ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले. यासर्व पार्श्वभूमीवर लोकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी, एकूणच यरोपातील इटली, स्पेन ,ब्रिटन, जर्मनी, फ्रांस तसेच अमेरिका, चीन यांसारख्या प्रगत देशांची अवस्था पाहून,डॉक्टर, नर्स पोलीस, सरकारी कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी व त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करन्यासाठी पंतप्रधानांनी वरील कार्यक्रम जनतेला दिला.
आधीच आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल कमी जागरूक असलेल्या भारतीय समाजाला कोरोना नावाचा बलाढ्य संकट आणि त्याची गहनता समजलेली नसताना, संबंध जनतेनी फटाके फोडून, मिरवणुका काढून, जल्लोश साजरा आणि त्यामगाचा उद्देश पायदळी तुडवला. काही ठिकाणी ज्यांनी लाईट बंद केली नाही त्यांच्यावर बळजबरी करण्यात आली. मुळात आधीच एकूणच मध्यमं आणि सरकारने कोरोनाशी आपण” युद्ध” लढत आहोत असं शब्द प्रयोग करून लोकांच्यातील राष्ट्रीय भावनेला तसेच भारतीय स्वाभिमानाला हात घातला होता. त्यामुले कोरोना विरोधातील आपण युद्धच जिंकलं या आविर्भावात संपूर्ण जनतेने जणू फटाके फोडून आणि मिरवणूनका काढून विजयी जल्लोष केला. परंतु या नंतरच कोरोना बद्दल घ्याव्या लागणाऱ्या उपाययोजना ना पाळल्यामुळे झपाट्याने कोरोना बधितांची संख्या महाराष्ट्र आणि पाठोपाठ देशभर वाढली आणि मृतांची संख्या ही झपाट्याने वाढली .
याच बरोबर दिल्ली, चंदीगड, मुंबई, पुणे, बेंगळुरू यांसारख्या शहरात lockdown मुले अडकलेल्या हजारो कामगारांचा सुरक्षिततेच्या आणि हातावर पोट असलेल्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा असताना सरकारी नियोजना अभावी ह्या कामगारांची हेळसांड होत असलेली दिसतिये यांतील कामगारांचे जथ्थे च्या जथ्थे रेल्वे ,बस बंद केल्यामुळे पायी आपापल्या गावाकडे निघालेले दिसत आहेत .
याच सुमारास दिल्लीतील तबलिकी प्रकरणामुळे काही ठराविक लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजात हिंदू मुस्लिम समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न एकूणच सोसिअल मीडिया मार्फत केले जात आहेत, उपाययोजनवर भर न देता हे लोक कशे चुकीचे आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असा आवेश निर्माण केला जात आहे .
बाकीचे देशांनी अगदी राष्ट्रीय आणीबाणी लागू करून सर्व लक्ष कोरोना निर्मूलनासाठी लावलेलं असताना आपण मात्र दिशाहीन आहोत. इतर देशांच्या तुलनेत भारतात 80 ते 90 हजार दिवसाला टेस्ट केल्या जात आहेत जे की एकूण लोकसंख्येचा विचार करता आणि संसर्ग चा वाढत प्रमाण लक्षात घेता ते खूप नगण्य आहे. साधारणपणे केंद्र आणि राज्य सरकारांना एकत्र येऊन सध्या उभ्या असलेल्या कोरोना रुपी संकटाला मुकाबला करणं गरजेचं आहे तसेच पुढे येऊ घातलेल्या आर्थिक मंदि मुळे शेतकरी ,कामगार वर्गा च्या समोर उभ्या ठाकलेल्या रोजी-रोटीच्या प्रश्नासाठी कृतिकार्यक्रम आखणे तेवढेच महत्त्वाचे आहे. जवळ-जवळ 21 दिवसांपासून बंद असलेल्या छोटे मोठं उद्योग समूह ,सहकारी उद्योग यांचाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यांच्या ही उभारी साठी सरकारला मोठया उपाययोजना क्रमप्राप्त आहेच.
केरळ, हिमाचल प्रदेश,उत्तराखंड ,मेघालय ,सिक्कीम, गोवा यांसारख्या पर्यटनाचा आधारित राज्यांना मोठा फटका बसणार आहे या राज्यांच अर्थकारण पूर्णपणे बिघडणार आहेच त्यामुळे हॉटेल व त्स्यम उद्योग ना देखील मोठा फटका बसणार आहे. एकूणच कोरोनाचा संकट भारतीय अर्थव्यव संस्थेला किमान 5 एक वर्ष मागे टाकणार असा दिसत आहे. यासर्व गोष्टींचा विचार कारुन भारतीय राज्यकर्ते सर्वोत्तपरी प्रयत्न करून योग्य उपाययोजना करतील आणि आशा करू की संपुर्ण भारतीय समाज आणि राज्यकर्ते यातून भोध घेऊन पुतळे, स्मारके तसेच जातीय आणि धार्मिक गोष्टींमध्ये न अडकता आरोग्य, बेरोजगारी तसेच शेतकरी, कामगार आणि आदिवासींचे बाजूला पडलेले प्रश्न याना प्राधान्य देऊन भविष्यात यावर भरीव काम करून कोरोना सारख्या रोगांवर मात करतील.
विकास वाळके
9673937171
(लेखक मुंबई स्थित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे दलित आणि आदिवासी विषयावर अभ्यास करत आहेत)